Home अकोले अकोले: खानापूर शिवारात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अकोले: खानापूर शिवारात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अकोले: बारा वर्ष वयाच्या मुलीच्या विनयभंग केल्याची घटना अकोले तालुक्यातील खानापूर शिवारात घडली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार म्हंटले आहे की, गुरुवार दिनांक १६ रोजी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान स्मशानभूमिजवळ रस्त्याने घरी जात असताना अनोळखी दुचाकीस्वराने तुला तुझ्या आजीकडे सोडतो असे सांगून दुचाकीवर बसवले आणि त्यानंतर उसाच्या शेतात नेऊन तुला करोना झाला आहे असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. ह्याबाबत पोलीस निरीक्षक जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपासाची चक्रे फिरली व आरोपी अजिंक्य दामोधर मालुंजकर रा. उंच खडक तालुका अकोले यास अटक करण्यात आली. श्री जोंधळे यांनी पदभार स्वीकारल्यापासून चैतन्यपूर येथील ३०२ गुन्ह्याचा तसेच गर्दनी येथील प्रकरणाचा तपास तातडीने करून आरोपींना अटक करण्यात आली.  

Website Title: Latest News Akole khanapur area crime

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here