Home अहमदनगर नगरमध्ये तबलिंगी जमातीच्या परदेशी नागरिकांना अटक

नगरमध्ये तबलिंगी जमातीच्या परदेशी नागरिकांना अटक

अहमदनगर: मरकजसाठी आलेल्या तबलिंगी जमातीच्या परदेशी नागरिकांना नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना आज शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या ५ परदेशी नागरिकांना नंतर अटक करण्यात येणार आहे.

तबलिगी जमातच्या मरकजसाठी आलेले परदेशी नागरिक व्हिसाचा गैरवापर केल्याचे उघडकीस आले. पर्यटन व्हिसावर आलेले असताना ते व्हिसामधील अटीचे उल्लंघन करून धर्मप्रसार करत असल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे नगरला आलेले २९ परदेशी नागरिक व त्यांना मदत करणाऱ्या अन्य पाच नागरिकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. नगरमधील भिंगार, जामखेड, नेवासा पोलिस स्टेशनमध्ये हे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले पाच परदेशी नागरिक सोडून अन्य २९ जणांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांच्यात पाच भारतीयांचा समावेश आहे. ते भाषांतरकार म्हणून त्यांच्यासोबत होते.

Website Title: Latest News Ahmednagar Foreign nationals arrested 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here