Home अहमदनगर मोर्निंग वॉक करणाऱ्या या सात जणांवर गुन्हा दाखल

मोर्निंग वॉक करणाऱ्या या सात जणांवर गुन्हा दाखल

नेवासा: करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरात हॉटस्पॉट पॉकेट जाहीर केले असतानाही घराबाहेर पडून मोर्निंग वॉक हौस पूर्ण करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कॉ. संभाजी गर्जे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, संतोष पगारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रताप दहीफळे,बाळासाहेब खेडकर शहर व परिसरात गस्त घालत होते. यावेळी काही जण मोर्निंग  वॉक करताना आढळून आले. त्यांना विचारणा करण्यात आली परंतु कोणतेही ठोस कारणे त्यांना देता आली नाही. अनावश्यक फिरत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

मुसा गणी शेख, सुरेश जगन्नाथ देशमुख, निकुलस शामियाल गायकवाड, अरुण रंगनाथ भोसले, मच्छिंद्र मोहिनीराज थोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा शहरात शहरात हॉटस्पॉट पॉकेट १३ एप्रिलला जाहीर केल्यानंतर शहरात हॉटस्पॉट लॉकडाऊन १९ एप्रिल ते २७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आल्याचे तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सांगितले आहे. अत्यावश्यक सेवाही  २७ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.  

Website Title: Latest News morning walk persons crime register

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here