Home संगमनेर संगमनेर तालुक्यात जमीन मोजण्याच्या कारणावरून सहा जणांना मारहाण

संगमनेर तालुक्यात जमीन मोजण्याच्या कारणावरून सहा जणांना मारहाण

संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील मांडवे बुद्रुक गावात असलेल्या डोमाळे वस्ती येथे जमीन मोजण्याच्या कारणावरून सहा जणांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी सात ते साडे सात वाजेच्या दरम्यान घडली आहे. लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी घारगाव पोलिसांत सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मारुती मना डोमाळे शुक्रवारी सकाळी त्यांची शेती गट नंबर ३१५ मधील ठरल्याप्रमाणे जमिनीची मोजणी करत असताना मोजणीच्या चुकीच्या खुणा दाखवितो असा आरोप करत मारुती डोमाळे, त्यांची आई पत्नी व मुलांना कोंडीभाऊ वाळा डोमाळे, गोरख कोंडीभाऊ डोमाळे, अंजनाबाई पंढरीनाथ डोमाळे, पांडुरंग कोंडीभाऊ डोमाळे, अंजनाबाई पंढरीनाथ डोमाळे, पांडुरंग कोंडीभाऊ डोमाळे, गणेश पांडुरंग डोमाळे, गणेश पांडुरंग डोमाळे, अनिल पांडुरंग डोमाळे, संदीप पंढरीनाथ डोमाळे, बायजाबाई पांडुरंग डोमाळे, अरुणा गोरख डोमाळे, अंजना पंढरीनाथ डोमाळे, आशाबाई बालाशिराम डोमाळे, जगन बालाशिराम डोमाळे, सुरेखा गोरख डोमाळे, बाळूबाई पांडुरंग डोमाळे, पार्वताबाई कोंडीभाऊ डोमाळे, सर्व जण डोमाळे वस्ती यांनी लाकडी दांडक्यासह लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. याप्रकरणी कोंडीभाऊ डोमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सोळा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

Website Title: Latest News Six men fight for land measuring cause Sangamner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here