निळवंडेतून ३४ हजार १२५ विसर्ग सुरु, प्रवरेला पुर परिस्थिती
अकोले: भंडारदरा निळवंडे पाणलोट क्षेत्रात सुरु असणाऱ्या जोरदार पावसामुळे निळवंडे धरणातून आज ३४ हजार १२५ कुसेक्सने विसर्ग सुरु आहे. त्यामुळे प्रवरा नदीला पूर आलेला आहे. प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रवरा नदीवरील सर्व छोटे पूल पाण्याखाली आहेत. पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग अजून वाढविण्यात येईल अशी माहिती जलसंपदा विभागाचे उप अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.
Website Title: Latest News Akole Nilwande Dam Visarg