Home अकोले राजूर: सर्वोदय विद्यालयातील गणरायाला निरोप

राजूर: सर्वोदय विद्यालयातील गणरायाला निरोप

राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा,वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयातील गणरायाला भव्य अशा मिरवणुकीतून निरोप देण्यात आला.

हा कार्यक्रम सत्यानिकेतन संस्थेचे सचिव टी.एन. कानवडे, सह सचिव मिलिंदशेठ उमराणी, संचालक व्ही. टी. पाबळकर, विजय पवार, विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उप प्राचार्य एल.पी. पर्बत, पर्यवेक्षक एस.ए. नरसाळे, एस.एस. पाबळकर, एन.एम. आभाळे, प्रकाश महाले, अजित गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम आर.डी. साबळे व सुरेश शेटे यांनी आयोजित केला होता.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्ही.बी. पांडे व सौ. पांडे यांच्या समवेत महापूजा करण्यात आली. गणरायाची पुजा व आरती करून विद्यालयातून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीत ढोल, लेझीम, झांज, टिपरी अशा विविध पथकांचा समावेश होता. मोठ्या जल्लोषात राजूर गावातून गणरायाची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी विद्यार्थी व गावातील नागरिकांनी या उत्सवाचा मनमुराद आनंद घेतला. अखेर भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. या मिरवणुकीत ढोल, लेझीम, झांज, टिपरी ह्या पथकांचे विशेष आकर्षण ठरले. या पथकांमध्ये एन.एम. आभाळे, बी.व्ही. भोसले, भाऊसाहेब बनकर, एस. आर देशमुख, सदाशिव गिरी, पांडे आर.पी. बी.एस.घिगे, संतराम बारवकर, जे.आर.आरोटे  सौ. सावंत बिना, स्मिता हासे, रीना राठोड, अविज्ञा चासकर, गीतांजली उंबरकर, सौ.ए.डी. देशमुख यांची महत्वाची कामगिरी ठरली.

तसेच हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बी. एन. ताजणे, व्ही.टी. तारू, डी.बी. पगारे, शरद तुपाविहीरे, संतोष कोटकर, एस.व्ही.घाणे, जी. एल. शिंदे, आर.एन. शेंडगे,एस.एन. वाकचौरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Website Title: Latest News svm Rajur Ganpati Nirop

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here