Home अकोले अकोले : गणोरेत आढळेच्या पाण्याचा मंदिराला वेढा; आढळा माईची ओटी भरून पुजा

अकोले : गणोरेत आढळेच्या पाण्याचा मंदिराला वेढा; आढळा माईची ओटी भरून पुजा

अकोले : अकोले , संगमनेर, व सिन्नर या तीन तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या १०६० दशलक्ष्‍ घनफुट क्षमतेच्या आढळा धरण अपेक्षेपक्षा लवकर भरून नदीपात्रात १४२९ क्यूसेकने पाणी वाहत असल्याने नदी कढच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

आढळा नदी पात्रात असणारी सर्व छोटी मोठी बंधार तुडूंब भरून आढळा धरणांतून मोठा विसर्ग चालू आहे. नदीला आलेला एवढा मोठा पुर ग्रामस्थांनी या आगोदर पाहिलेला नाही. नदीला आलेला पुर पाहण्यांसाठी नदी काठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. यापुर्वी २०१५, २०१६, आणि २०१७ ला आढळा धरण जेमतेम भरलेले होते. मागील वर्षी आढळा धरणात केवळ ५३७ दलघफु पाणी जमा झाले होते. त्यामुळे आढळा परिसराला भयानक दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. ४ ऑगस्टला रविवारी सकाळी सहा वाजता आढळा धरण पूर्ण क्षमतेन भरून नदी वाहती झाली आहे. गणोरे येथिल अंबिका मंदिराला पाण्यानी वेढा दिला आहे.

आढळा पाणलोट क्षेत्रात तंततधार विक्रमी पावसाने आढळा धरण भरले आहे. बऱ्याच वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आढळा नदीतून गावातून पाणी वाहत असल्याने नदी काठच्या शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सोमवारी जि. प सदस्य डॉ. किरण लहामटे यांनी प्रदिप भालेराव, सोमनाथ दातीर, सुभाष आहेर, सोनवने, बापु आंबरे, प्रशांत आंबरे, गणेश आहेर, गणेश सोनवणे या कार्यकर्त्यां समवेत जलपुजन केले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी गावातील ग्रामस्थांनी टाळ मृदूंगाच्या गजरात मोठ्या संख्येने जाऊन ग्रामस्थांनी खना –नारळ व चोळी- पातळ वाहून आढळा माईची ओटी भरून पुजा करण्यात आली.

Website Title: Latest News Akole : Surrounding Temples In The Ganapur; Wear Half A Mai Otti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here