Home अकोले अकोलेचे पंचायत समितीचे बीडीओ सक्तीच्या रजेवर

अकोलेचे पंचायत समितीचे बीडीओ सक्तीच्या रजेवर

अकोले: अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. त्यांच्यावर जिल्हा परिषद सदस्या सुषमा दराडे यांनी गंभीर आरोप केले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस. पाटील यांनी हि कारवाई केली.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची काल बैठक होती. या बैठकीपूर्वी पाटील यांनी गटविकास अधिकारी रेंगडे यांना बोलावून घेतले होते. त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप व त्यासंदर्भातील कागदपत्र सोबत आणण्याचेही सांगण्यात आले होते. सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्याने त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

स्थायी समितीची सभा सुरु झाल्यानंतर जि. प. अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांवरील आरोपांबाबत विचारणा केली. तसेच या संदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सुचना आठ दिवसांपूर्वीच आपण दिल्या असून त्याचे काय झाले याची विचारणा केली. त्यावेळी गटविकास अधिकारी रेंगदे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याची माहिती पाटील यांनी सभेत दिली.

Website Title: Latest News Akole’s BDO forced leave

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here