Home अकोले अकोलेत सिनेस्टाईल मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

अकोलेत सिनेस्टाईल मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

अकोले: आपल्या राहत्या घरासमोर ओट्यावर बसलेल्या ११ वर्षाच्या मुलाचे सिने स्टायल अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

अकोले शहरातील इस्लामपेठ परिसरात राहणाऱ्या अमीन सरग शेख हा इयत्ता ५ वी मध्ये मॉडर्ण हायस्कूलमध्ये शिकतो. काल गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अमीन आपल्या लहान बहिणीला बालवाडीत सोडून आल्यानंतर दारासमोरील ओट्यावर बसलेला होता. अचानक एक लाल रंगाची गाडी तेथे आली. त्यात बसलेल्या तीन अज्ञात इसमांनी अमीनला गाडीजवळ बोलावून घेतले. तुम हमारे साथ गाडी में नही आया, तो हम तेरे अब्बाको मार देंगे अशी धमकी दिली. पण अमीन त्यांच्या गाडीत बसला नाही. त्यामुळे गाडी निघून गेली.

पण अमीनने सायकलने या गाडीचा पाठलाग केला. अकोले संगमनेर रस्त्यावर शेकईवाडी येथे फरशीच्या दुकानाजवळ गाडी थांबली. त्यांनी त्याला सायकलसह आत टाकले. गाडी संगमनेरच्या दिशेने निघाली. पण गाडीत बसलेल्या एका इसमाला फोन आला. त्यांनी शेकईवाडीतील पेट्रोलपंपाजवळ सायकलसह अमीनला खाली उतरवून देत गाडी संगमनेरच्या दिशेने निघून गेली. अमीनला याबाबत विचारले असता गाडीतील तिन्ही इसमांनी मास्क घातल्याचे तो सांगतो. त्याला तेथे उतरविल्यानंतर त्याने पेट्रोल पंपांवरील कर्मचार्याकडून वडिलांना फोन लावण्यास सांगितले. तेव्हा वडिलांशी संपर्क साधल्यानंतर वडिलांनी मामेभाऊ याला पाठविले. त्यांनतर अमीन व त्याच्या नातेवाईक यांनी थेट अकोले पोलीस ठाणे गाठले व सर्व हकीकत सांगितली.     

Website Title: Latest News Akole kidnapping attempt was failed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here