आ. किरण लहामटे यांना थोडा वेळ द्या तालुक्याचा विकासात्मक चेहरा नक्कीच बदलेल: प्रा. चंद्रभान नवले
प्रा. चंद्रभान नवले: आमदार किरण लहामटे सुसंस्कृत, समाजशिल, कर्तव्यनिष्ठ आणि कर्तबगार लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहे. त्यांना थोडा वेळ द्या, सकारात्मक पाठिंबा द्या. तालुक्याचा विकासात्मक चेहरा नक्कीच बदलेल.
आमदार किरण लहामटे साहेब यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदारी व कर्तव्याची सुचना देणे, ठेकेदारांना दर्जेदार कामं करा सांगणं, सामान्य माणसामध्ये मिसळणे याबाबत विरोधीपक्षनेते कार्यकर्ते यांनी प्रसारमाध्यमे व सोशल मीडिया वर जनतेची दिशाभूल करणारी नकारात्मक दृष्टीने चर्चा करणं दुर्दैवी आहे.
लोकप्रतिनिधींनी सामान्य माणसाला मानसन्मान देणं, कर्तव्याला जागणं हा दोष नाही. आजपर्यंत माजी लोकप्रतिनिधींनी मर्यादित संधीसाधूचे कोंडाळे सोडून सामान्य माणसाला कधी जवळ केलेच नाही.याउलट नवनिर्वाचित आमदार साहेब जनसामान्यांमध्ये मिसळून राहतात, त्यामुळे लोकप्रतिनिधी व जनता यातील दुरावा नष्ट झाला. तेव्हा सामान्य माणसाला हायसं वाटणं साहजिक आहे. हुकुमशाही, सरंजामी व्यवस्था नष्ट झाल्याचे भावनेतून जनता आमदारांच्या समावेत फोटो / सेल्फी काढण्याचे आग्रह करतात. ही लोकप्रियता विरोधकांना मानवत नाही म्हणून आमदार साहेबांना बदनाम करणारे षडयंत्र राबविण्यात येत आहे.
लहान मुलं हे भारताचे आशास्थान व आधारस्तंभ आहेत. त्यांना बालमेळाव्यात सहभागी होऊन स्पुर्ती देणारे आमदार किरण लहामटे खरे समाजशिल शिक्षक आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्राचीन भारतीय सांस्कृतीक परंपरामुळे भारताला जगातील सर्वात श्रेष्ठ सुसंस्कृत देश म्हणून ओळखले जाते. बोहडा किंवा आखाडी हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. व बोहडामध्ये नृत्य सादर करताना वापरले जाणारे तलवार किंवा इतर आयुधं लाकडी असतात.बोहड्यामध्ये नृत्य करणं सुसंस्कृत समाजातील खऱ्या व्यक्तीमत्त्वाचं लक्षण आहे. बोहड्यातील आमदार साहेबांचे नृत्य यापुर्वी तालुक्यातील विरोधी सरंजामी नेते किंवा कार्यकर्त्यांनी केलेल्या रंगिल पार्ट्या किंवा ऐय्याशी इतके वाईट तर नक्कीच नाही. त्यामुळे सुसंस्कृत अध्यात्मिक नृत्याला वाईट बोलणाराच्या संकुचित बुद्धीची किव येते.
आमदारांकडून मतदारांना कामांची अपेक्षा आहे हे आम्ही नाकारत नाहीच. निवडुन आल्यानंतर तात्काळ तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, स्थानिक स्वराज्य संस्था चे अधिकारी, पोलिस अधिकारी, विजवितरण अधिकारी, पाटबंधारे अधिकारी यांच्या आठवड्यात दोन दोन बैठका घेणारा,सुचना करणारा तालुक्यातील पहिला लोकप्रतिनिधीं म्हणून आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची समस्या जाणून घेणारा शरदचंद्रजी पवार साहेबांचा खरा शिलेदार म्हणून तालुक्यातील जनता आमदार किरण लहामटे साहेबांकडे पाहात आहे.
नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशनात मिळालेल्या अल्प वेळात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रतिभेचा गौरव करुन तालुक्यातील प्राथमिक शाळा, महाविद्यालयीन शिक्षण ,परीवहन समस्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, विज प्रश्न, आदीवासी समाजातील प्रश्न, आर्थिक क्षमतेचे प्रश्न स्वतःच्याच सरकार समोर मांडुन सभागृहाच्या टाळ्या मिळवल्या. असे यापुर्वीचे लोकप्रतिनिधींनी कमी वेळात जास्त प्रश्न सभागृहात मांडल्याचे कधी जाणवलं नाही. तेव्हा नवनिर्वाचित आमदार साहेबांना लोकप्रतिनिधी म्हणून कामे करण्यासाठी थोडा वेळ द्या. आमदार किरण लहामटे साहेब शेतकऱ्यांचे कैवारी मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शैक्षणिक, औद्योगिक,कृषक, आरोग्य क्षेत्रातील विकसित अकोले तालुका म्हणून जनतेच्या अपेक्षा नक्कीच पुर्णत्वास नेतील असा मला आत्मविश्वास आहे.
तेव्हा विधानसभेच्या पराभवानंतर आमदार किरण लहामटे साहेबांच्या लोकप्रियता व कामांचे धडाक्याने सैरभैर झालेल्या विरोधकांना आता स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था पण हातातुन निसटुन जाण्याचे भिती वाटत आहे. म्हणून पराचा कावळा करुन आमदार साहेबांना बदनाम करणारे षडयंत्र रचले जात आहे. विरोधी पक्ष व कार्यकर्त्यांनी बदनामी करणं बंद करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शांत बसणार नाही.
Website Title: Latest News MLA Kiran Lahamte take a time