Home महाराष्ट्र हिंमत असेल तर अटक करा: प्रकाश आंबेडकर

हिंमत असेल तर अटक करा: प्रकाश आंबेडकर

मुंबई: नागरिकत्व कायद्याला आमचा विरोध आहे. भाजपमध्ये हिंमत असेल तर अटक करून दाखवा असे वक्तव्य भा. बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल मुंबईत केले.

या देशात मोदी आणि शहा हे हुकुमशाही करीत आहे. नागरिक हा राजा आहे त्यांच्या हक्कावर गदा येत असेल तर कायदा लागू होऊ देणार नाही असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मुंबईत मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रकाश आंबेडकर बोलत होते.

या देशातील सुजाण नागरिकांना स्थानबद्धता केंद्रामध्ये जायचे नसेल तर या कायद्याला विरोध करायालाच हवा. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार पडले पाहिजे दोन लाख्जन मावतील इतके मोठे स्थानबद्धता केंद्र बांधले जात आहे. तिथे जायचे नसेल तर मोदी सरकार पाडा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले.

Website Title: Latest News Arrest if you have the courage Prakash Ambedkar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here