सांस्कृतीक कार्यक्रमात विदयार्थ्यांनी जिंकली उपस्थितांची मने….
शेणित: चंदणाच्या झाडाला कापले तरी ते सुगंध सोडत नाही.उस कोळशात पेरला तरी गोडवापन सोडत नाही. हत्ती वृद्ध अवस्थेतही बंबल राहतो. तशी चांगली मानसे समाजात कोठेही गेले तरी आपल्या गुणांना सोडत नाही. या गुणवत्तेबरोबर कलावंत देखील निर्मान करणे काळाची गरज आहे. तसेच लहान मुले म्हणजे मातीचा गोळा आकार दयावा तशी मुर्ती घडते म्हणुनच विदयार्थांच्या गुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी या उदांत हेतुने सत्यनिकेतन संचलीत डॉ.राजेंद्रप्रसाद प्राथमीक व माध्यमिक आश्रमशाळा शेणित (ता.अकोले ) या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटण शाळेचा माजी विदयार्थी पत्रकार युवा नेते सुनिल लोखंडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन तसेच नारळ वाढवुन करण्यात आले.
यावेळी उपस्थित सरपंच भाऊराव धोंगडे, पो.पाटील रामदास धोंगडे मेजर बांगर,माध्य.मुख्याध्यापक संजय शिंदे, प्राथ.मुख्याध्यापक शामराव साबळे, जेष्ठ शिक्षक ज्ञानदेव आरोटे यासंह बहुसंख्य ग्रामस्थ,माजी विदयार्थी उपस्थित होते.
या निमित्ताने विदयार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रमात विविध कला नृत्य सादर करीत देशभक्तीपर गीत,पवाडे,रेकॉर्ड डान्स,नाटीका,समुह नृत्य, लावणी, शळ्या बातम्या यांसारख्या कार्यक्रमातुन उपस्थितांची मने जिंकली.प्रेक्षकांनीही आर्थिक स्वरूपात कलाकारांचे भरभरूण कौतुक केले. यांसाठी ड्रेपरी करण्यासाठी आरोटे एम.डी,बर्मन एस.आर,कांचन शेळके यांनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाळासाहेब चौधरी, मुतडक एस.एन, नवले आर.सी, वैराळ जी.जी,पराड एम.ए,किसन पवार, अंबादास जीर्वेकर इत्यादी शिक्षकांनी अथक परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन युवराज गभाले यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संजय शिंदे यांनी मांडले.
पत्रकार युवा नेते सुनिल लोखंडे
Website Title: Latest News Attendees win hearts at cultural events