Home अकोले अमोल शिर्के यांना अखिल गुरव समाज संघटनेच्यावतीने समाजभूषण पुरस्कार

अमोल शिर्के यांना अखिल गुरव समाज संघटनेच्यावतीने समाजभूषण पुरस्कार

अकोले :- अकोले तालुक्यातील पत्रकार अमोल मारुती शिर्के यांना अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने देण्यात येणारा मानाचा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

अखिल गुरव समाज संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा व वधू वर परिचय मेळावा पुण्यातील आकुर्डी येथील खंडोबा माळ येथे पार पडला. या मेळाव्याचे औचित्य साधत गुरव समाजातील रत्नांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पत्रकार अमोल शिर्के हे नऊ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहे.पत्रकारितेच्या माध्यमातून अमोल शिर्के यांनी समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्या या कामाची दखल घेऊन गुरव समाज संघटनेच्या वतीने त्यांना आज समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मावळचे खा.श्रीरंग बारणे,भोसरीचे आ.महेशदादा लांडगे,अकोलेचे आ.डॉ.किरण लहामटे, गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आण्णा शिंदे,भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे,सुरेखा तोरडमल आदींच्या उपस्थितीत शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ, सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी अशोक पांडे,बाळासाहेब घोडके,सतीश शिर्के,पत्रकार आशिष ढगे,संतोष चौधरी,अक्षदराज जाधव,शरद शिर्के,अनिल शिर्के,अविनाश पांडे,सुमित शिर्के,दिगंबर पांडे,दिलीप पारासूर,स्वप्नील शिर्के आदी उपस्थित होते.

Website Title: Latest News Social Welfare Award on behalf of the Gurav Samaj Organization

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here