बाळासाहेब थोरात म्हणतात, मुख्यमंत्री यशस्वी आणि लोकप्रिय ठरत आहे
संगमनेर: मुख्यमत्री उध्दव ठाकरे यांची सर्वाना सामावून घेण्याची कार्यपद्धती, वागण्याची सहजता, आत्मविश्वास त्याचबरोबर कोणतेही डावपेच न करता विकासाच्या दृष्टीने घेतलेले निर्णय यामुळे ते यशस्वी व लोकप्रिय ठरत आहे. असे कॉंग्रेस पप्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
आजच्या तरुणांनी राजकारणात काम करताना कामात जिद्द, प्रामाणिकपणा ठेवावा, असलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडल्यास यश नक्की मिळते असेही त्यांनी सांगितले.
युवक कॉंग्रेसच्या वतीने आयोजित छत्रपती युथ फेस्टिवलमध्ये महाराष्ट्रदिनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांशी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ते म्हणाले आपण कायमच राज्यघटनेच्या तत्वांशी निगडीत राहून कॉंग्रेसचा विचार जपला आहे. आजच्या तरुणानी स्वतःच्या जीवनात सकारात्मकता वाढविताना जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास जीवनात नक्की यश मिळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार अतिशय चांगले काम करीत आहे. माझ्या ३५ वर्षाच्या कालावधीत १२ वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती पाहण्याची व काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येकाचे कार्य वैशिष्टे वेगळे होते. आपल्या जीवनात सयाम, प्रामाणिकपणा, पक्षनिष्ठा हेच यशाचे गमक आहे. करोनामुळे राज्यात अनेक दिवस लॉकडाऊन असताना जनतेने सहकार्य केले हे सहकार्य मोलाचे असून प्रशासन सरकार यांचे काम कौतुकास्पद राहिले आहे.
प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्हिडियो कॉन्फरन्स संवाद आयोजित करण्यात आला होता.
Website Title: Latest News CM is becoming successful and popular