Home संगमनेर संगमनेर: नियम भंग करणाऱ्यांवर नगरपरिषदेची कारवाई  

संगमनेर: नियम भंग करणाऱ्यांवर नगरपरिषदेची कारवाई  

संगमनेर: नगरपरिषदेने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यावर थुंकणे, तोंडास मास्क न घालणे, सोशियल डीस्टन्स न ठेवणे यासारख्या नियम भंग करणाऱ्या नागरिकांवर संगमनेर नगरपरिषदेकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत १ लाख ७ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी दिली आहे.

मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशासन अधिकारी यांनी संगमनेर शहरात दंडात्मक कारवाई केली. रस्त्यावर थुंकणारेना ११० नागरिकांकडून १६ हजार ५५० रुपये, तोंडास मास्क न लावणे व  सोशियल डीस्टन्स न ठेवणे अशा १३७ नागरिकांवर कारवाई करून ९१ हजार रुपये असे एकूण एक लाख  हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तरी शहरातील नागरिकांनी तोंडास मास्क न लावणे, सोशियल डीस्टन्स पाळणे इतरत्र कोठेही थुंकू नये आदी नियमांचे पालन करून आपल्यावर होणारी कारवाई टाळावी. करोना साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार चेहर्यावर मास्क न लावणे  ५०० रुपये, धुम्रपान करून रस्त्यावर थुंकणे १५० रुपये, सोशियल डीस्टन्स न ठेवणे व्यावसायिकांना २००० रुपये व नागरिकांना २०० रुपये दंडात्मक कारवाई कारवाई करण्यात येत आहे.

संगमनेर नगरपरिषद नागरिकांच्या आरोग्याच्या काळजी घेत असून विविध उपाययोजना करत असताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. करोना सारख्या आजारावर लढा देत असताना शहरातील नागरिक डॉक्टर, व्यापारी संस्था, सामाजिक संस्था, आदीनी अतिशय चांगले सहकार्य केले आहे. भविष्यातही नागरिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांनी केले आहे.  

Website Title: Latest News Sangamner Breach of rules

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here