Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक करोना बाधित संख्या ४४ वर

अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक करोना बाधित संख्या ४४ वर

अहमदनगर: जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. पाथर्डी तालक्यातील मोहोज देवढे येथील ४५ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील करोना बाधित संख्येत एकाने वाढ झाली आहे.

ही व्यक्ती शेतमाल घेऊन मुंबईला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर त्याला त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता करोना बाधितांची संख्या ४४ वर पोहोचली आहे. गेला पाच दिवसानंतर जिल्ह्यात पुन्हा करोना बाधित व्यक्ती आढळून आल्याने जिल्ह्याच्या सीमेवरील नाकेबंदी कडक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या जामखेड येथे बुधवार दिनांक ६ व संगमनेर येथे गुरुवार दिनांक ७ मे पर्यंत संचारबंदी राहणार आहे. जिल्ह्यात एकूण ४४ करोनाबाधित आढळले यापैकी २५ रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहे.

Website Title: Coronavirus Ahmednagar one found total 44 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here