Home अकोले अकोले तालुक्यात मुलीसह आईची पाझर तलावात उडी मारून आत्महत्या

अकोले तालुक्यात मुलीसह आईची पाझर तलावात उडी मारून आत्महत्या

राजूर: अकोले तालुक्यातील धामनवन येथील महिलेने दोन वर्षाच्या मुलीसह शिरपुंजे जवळील देवहंडी पाझर तलावात आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दिनांक २ जूनला घडली.

सासरच्या माणसांकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे. त्यामुळे अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांचन पंकज सोनवणे वय २२ व स्वरा पंकज सोनवणे वय २ असे मृतांची नावे आहेत.

कांचनचे वडील मारुती काशिनाथ कदम यांनी दिलेलेया फिर्यादीवरून पती पंकज सोनवणे, सासू मंदाबाई निवृत्ती सोनावने यांच्यावर आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सासू मंदाबाईला अटक करण्यात आली आहे.

मयत कांचन पंकज सोनवणे हिचे धामणवन येथील पंकज निवृत्ती सोनवणे बरोबर तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते. कांचनला सासरचे लोक तिचा छळ करीत असे. शेततळे बांधण्यासाठी पन्नास हजार रुपये माहेरहून घेऊन ये अशी मागणी करत होते. तीन दिवसांपूर्वी घरात किरकोळ वादही झाले होते. या त्रासाला कंटाळून कांचन मुलीसह घर सोडून गेली होती. पती पंकज यांनी कांचन बेपत्ता असल्याची माहिती दिली होती. मंगळवारी कांचन आणि तिची स्वरा यांचे मृतदेह देवहंडी येथील पाझर तलावात आढळून आले. सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Website Title: Latest News commits suicide by jumping into seepage lake

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here