सरसकट कर्जमुक्ती धोरणासाठी ८ जानेवारी २०२० रोजी भारत बंद: किसान सभा
अकोले: अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन २९ व ३० नोव्हेंबर रोजी मालवणकर सभागृह दिल्ली येथे संपन्न झाले. देशभरातून २०८ शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी अधिवेशनात आपला सहभाग नोंदविला.
महाराष्ट्रातून किसान सभा, स्वभिमानी शेतकरी संघटना, लोकमोर्चासह प्रमुख शेतकरी संघटना अधिवेशनात सहभागी झाल्या. डॉ. अशोक ढवळे, राजू शेट्टी, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, डॉ. अजित नवले यांनी विचारमंथनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांना सरसकट देशव्यापी कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट हमीभावासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा करा, शेतकऱ्यांना पिकविम्याचे सर्वकष संरक्षण द्या, सिंचन, दुष्काळ, पेन्शन , आरोग्य, पर्यावरण यासंह सर्व मुद्द्यांचा विचार करून शेती क्षेत्राच्या विकासासाठी सर्वकष विकास व्हावा यासाठी देशव्यापी धोरण स्वीकारा या प्रमुख मुद्द्यांसाठी देशव्यापी संघर्षाचे नियोजन यावेळी करण्यात आले. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर दिनांक ८ जानेवारी २०२० रोजी ग्रामीण भारत बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अखिल भारतीय किसान संघर्ष समितीचे, व्ही.एम. सिंग, हनन दा. डॉ. अशोक ढवळे, राजू शेट्टी, प्रेम सिंग, दर्शन पाल, किरण विसा, आदींनी यावेळी अधिवेशनाचे संचलन केले.
Website Title: latest News debt relief policy Kisan sabha