Home अकोले डॉ. लहामटे यांना मंत्रिमंडळात समावेश करण्याची भांगरेंची मागणी

डॉ. लहामटे यांना मंत्रिमंडळात समावेश करण्याची भांगरेंची मागणी

अकोले: माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांची ४० वर्षाची सत्ता उल्थावणारे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते अशोक भांगरे, अमित भांगरे यांनी केली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची व कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी  मंत्रीपदाची शपथ घेतली असल्यामुळे अकोले व संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी गुलाबाची उधळण करत फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.

भांगरे म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांच्या मालकीची जागा भंडारदरा धरणाच्या परिसरात आहे. त्यामुळे ठाकरे घराण्याबद्दल आदिवासी जनतेच्या मनात आदराची भावना आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या रूपाने आदिवासी समाजाला मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले तर हा आनंद द्विगुणित होईल.

Website Title: Latest News Demand of minister kiran lahamte

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here