उद्धव ठाकरे सरकारमध्ये या ६ कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश
मुंबई: आज शिवतीर्थावर ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात जनसागराच्या साक्षीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे, शिवसेना नेते सुभाष देसाई, कॉंग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात, विदर्भातील प्रमुख नेते नितीन राउत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली.
Website Title: Latest News Uddhav Thakare cabinet Minister