Home अकोले शिव्या शाप देऊन कुणाचे भले झाले आहे का? : वैभव पिचड

शिव्या शाप देऊन कुणाचे भले झाले आहे का? : वैभव पिचड

अकोले: राज्याला विकासाच्या वाटेने नेणाऱ्या तसेच स्वच्छ व पारदर्शी कारभार करणाऱ्या भाजप शिवसेना महायुतीच्या पाठीमागेच लोक उभे राहतील असा ठाम विश्वास आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केला. शिव्या शाप देऊन कुणाचे कधी भले झाले आहे का? असा टोलाही शिवराळ भाषेत टीका करणाऱ्या विरोधकांना लगावला.
अकोले पत्रकारांशी बोलताना आ. पिचड म्हणाले, अकोले विधानसभा मतदार संघाचे आपण दोन प्रचार दौरे पूर्ण केले आहेत. या संपूर्ण कालखंडात आपण किंवा माजी मंत्री मधुकरराव पिचड अथवा महायुतीच्या कार्यकर्त्याने विरोधकांवर कधीही पातळी सोडून खालच्या पातळीवर जाऊन टीका केली नाही. विकास कामे हाच आमच्या निवडणुकीचा अजेंडा आहे. अकोले तालुक्यात गेल्या चाळीस वर्षात झालेली विकास कामे व भविष्यात होणारी विकासकामे यावरच आपण प्रचार केला आहे.

तालुक्यातील कोल्हार घोटी या मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे शहरातून जाणाऱ्या या राज्य मार्गाचे आता गेवराई शहापूर अशा राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले असून केंद्रातील स्थानाकडे पाठपुरावा करून या महामार्गाचे कामही मार्गी लावण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सिन्नर घारगाव या रस्त्यासह संपूर्ण मराठवाड्याला मुंबई जवळ करणारा तोलारखिंड रस्त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न केले जाणार आहे.

Website Title: Latest News development of Akole Taluka 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here