Home अकोले अकोले मतदार संघात प्रमुख केंद्रावर झालेल्या मतदानाची टक्केवारी

अकोले मतदार संघात प्रमुख केंद्रावर झालेल्या मतदानाची टक्केवारी

अकोले: सार्वत्रिक विधानसभा निवडणुका २०१९ करिता काल अकोले मतदार संघात एकूण ६७.७३ टक्के मतदान झाले. ९३ हजार ६८२ पुरुष व ७८ हजार ४८१ महिला अशा एकूण १ लाख ७२ हजार १६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला अशी माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली.  काही ठिकाणी मतदान प्रक्रिया संथ गतीने झाल्याने लोकांना थांबवून राहावे लागले. इतरत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

मतदान संघातील प्रमुख केंद्रावर झालेल्या मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे: निळवंडे (७६ टक्के), आंबड(७७.२ टक्के), वाशेरे (७३.६३ टक्के), डोंगरगाव (७३.२८), गणोरे(६९.३९ टक्के), देवठाण (७० टक्के), पिंपळगाव निपाणी (७१.२४ टक्के), विरगाव (६९ टक्के).

मतदानाची टक्केवारी पावसामुळे घटण्याची शक्यता वर्तविली जात होती परंतु अकोले विधानसभा मतदारसंघात पावसाने उसंत दिल्याने उमेदवारासह कार्यकर्त्यांनी सुस्कारा सोडला. दिवसभरात विविध पक्षांचे  उमेदवार यांनी मतदार संघातील मतदान केंद्राबाहेर जाऊन मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या.

Website Title: Latest News Akole constituency polls

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here