Home अकोले अकोले: मतमोजणीस्थळी जॅमर बसविण्यात यावे: राष्ट्रवादी कॉंग्रेस

अकोले: मतमोजणीस्थळी जॅमर बसविण्यात यावे: राष्ट्रवादी कॉंग्रेस

अकोले: मतदान केलेल्या इव्हिएम मशीनमध्ये छेडखानी होऊ नये म्हणून इव्हिएम मशीन ठेवलेल्या ठिकाणी तसेच मतमोजणी स्थळी जॅमर बसविण्यात यावे अशी मागणी अकोले तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे  करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी ही मागणी केली आहे.

सोमवारी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सर्व मतदान यंत्रे गोडावूनमध्ये ठेवण्यात आली आहे. या गोडावून परिसरात हे जॅमर बसवावेत या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे, अजित नवले, विनय सावंत, संपतराव नाईकवाडी, सोमनाथ नवले, खंडू वाकचौरे आदींनी तहसीलदार यांना सादर केले.

निवेदनात म्हंटले आहे की, इविएम मशीनमध्ये इंटरनेट च्या साह्याने छेडखानी केली जाऊ शकते. त्यामुळे हे इव्हिएम ठेवण्यासाठी जॅमर बसवावेत. तसेच मतमोजणीच्या दिवशी त्या ठिकाणी जॅमर बसविण्यात यावे. दरम्यान मुकेश कांबळे यांनी हे निवेदन स्वीकारले. आपल्या स्थरावर हि कार्यवाही करू शकत नाही असे सांगत असमर्थता दर्शवली. निवडणूक आयोगाकडे तुमचे निवेदन पाठवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यवाही केली जाईल.  

Website Title: Latest News jammer should be installed at the counting center

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here