Home अकोले अकोले: विजेचा शॉक बसून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

अकोले: विजेचा शॉक बसून शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू

अकोले: विजेचा शॉक बसून १४ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अगस्ती कारखान्याच्या शिवारात घडली.

रामदास भाऊसाहेब पाटोळे (मूळ राहणार बीड)कार्यस्थळ अगस्ती कारखाना अकोले असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. संबंधित मृत मुलाचे वडील उस तोडणी मजूर म्हणून काम पाहत आहे. तो इयत्ता ९ वी मध्ये मॉडर्ण हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, अगस्ती साखर कारखान्यावर काही उस तोडणी मजूर बेने वाहण्यासाठी थांबलेले आहेत. काल सायंकाळच्या सुमारास अकोले शहर व परिसरात सुमारे एक दीड तास चांगला पाऊस पडला. या मुलाचे आई वडील हे विधानसभा मतदानासाठी त्यांच्या गावी गेले होते. कारखाना परिसरात कोपी करून राहत असणाऱ्या या मुलाबरोबर त्याची लहान बहिण राहत होती. विद्यत पोल जवळ बांधलेला बैल सोडण्यासाठी रामदास गेला होता. त्याचा तारेला हात लागला. यावेळी पोलला ताण दिलेला तारेत विद्युत प्रवाह उतरला त्यामुळे त्याला विजेचा शॉक बसला. या घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीवरून अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदकरण्यात आली आहे.  

Website Title: Latest News death of a Student in shock in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here