Home अकोले १५ मिनिटांत करोनाचे निदान; अकोलेच्या लेकीचा टेस्ट कीट शोध

१५ मिनिटांत करोनाचे निदान; अकोलेच्या लेकीचा टेस्ट कीट शोध

अकोले: करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटांत करणाऱ्या टेस्ट कीट च्या निर्मितीत अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शीतल रंधे महाळूंकर हिचे मोठे योगदान आहे. या किटला पुणे येथील एनआयव्ही या संस्थेकडून मान्यता मिळाली आहे.

अकोले तालुक्यातील पिंपळदरी हे गाव शीतल रंधे चे माहेर आहे. तिचे शिक्षण एम.एस्सी. बायोटेक झाले असून त्या कुसगाव पुणे येथील इम्रो सायन्स या कंपनीत संशोधक व विकास रिसर्च या विभागात प्रमुख आहे. मागील पाच वर्षापासून या विभागाची जबाबदारी सांभाळत आहे. या कंपनीने प्रेगनन्सी, डेंगू, एचआयव्ही, असे निदान करणाऱ्या टेस्ट कीट बनविलेल्या आहेत.

सुरुवातीला कीट बनविण्यासाठी परवानगी मिळवली. त्यासाठी लागणारा कच्चा माल मिळविला. जास्त मेहनत घेऊन अल्पावधीत टेस्ट कीट विकसित केली. पुण्यातील एनआयव्हीकडे ही कीट तपासणीसाठी पाठविण्यात आल्या. दोन दिवसानी या किटला मान्यता मिळाली. लवकरच ही कीट बाजारात उपलब्ध होत आहे.

शीतल हि कन्या शाळेत शिकली तर अकोले महाविद्यालयात बारावी तिने पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून पदवी केली. तिने संकटकाळात देशासाठी चांगले योगदान दिले याचा अभिमान सर्व अकोलेकर यांना आहे.

Website Title: Latest News Diagnosis of corona Kit

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here