Home अकोले समशेरपूरच्या अगस्ती विद्यालयाची कबड्डी व खो खो संघाची जिल्हा पातळीवर निवड

समशेरपूरच्या अगस्ती विद्यालयाची कबड्डी व खो खो संघाची जिल्हा पातळीवर निवड

समशेरपूर: अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या अकोले तालुका कबड्डी व खो खो  स्पर्धेत १९ वर्षे मुले कबड्डी व १९ वर्षे मुली खो खो संघ अगस्ती विद्यालय समशेरपूर संघाने विजेते पद पटकावून या संघाची जिल्हा पातळीवरील स्पर्धेत निवड झाली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा यंदा प्रथमच अकोले तालुक्याच्या ग्रामीण भागातील समशेरपूर गावातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अगस्ती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या .विद्यालय व तालुका क्रीडा शिक्षकांनी या स्पर्धा यशस्वी पार पाडल्या.या तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत समशेरपूरच्या अगस्ती विद्यालयातील १९ वर्षे मुली या संघाने अंतिम सामन्यात राजूरच्या सर्वोदय कॉलेज संघाचा पराभव करून संघ जिल्हा स्तरीय निवड झाली. तसेच या कबड्डी स्पर्धेत १४ व १७ वर्षे मुलांचे संघाने उपविजेते पद मिळवले आहे.

तसेच खो खो तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन न्यू हायस्कुल लिंगदेव येथे होते येथे ही अगस्ती विद्यालय समशेरपूरच्या १९ वर्षे मुले संघाने अकोले कॉलेजच्या बलाढ्य संघाला हरवून विजेते पद पटकावून शाळेचे नाव रोशन केले ,आणि खो-खो स्पर्धेत ही विद्यालयातील १७ वर्ष मुले व मुलींचा संघाने अंतिम सामन्यात धडक मारली परंतु त्यांना एकलव्य मवेशी संघा विरुद्ध पराभव  पत्करावा लागल्याने उपविजितें पदावर समाधान मानावे लागले.

त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.या सर्व खेळाडूंचा एकत्रित प्रयत्नांचा व मार्गदर्शकांच्या नियोजनाचा हा विजय असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना इतिहासाची हिरे माणिके हे पुस्तक प्रोत्साहन पर भेट म्हणून विद्यालयाचे प्राचार्य अण्णासाहेब अडांगळे यांनी दिले  .

विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गणपत धुमाळ यांनी विशेष मेहनत घेऊन खेळाडूंना सांघिक कामगिरी साठी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच विद्यालयाचे क्रीडा प्रेमी शिक्षक सुरेश वाकचौरे,रमेश बेनके ,प्रशांत पुंडे, फटांगरे व्ही. एस.व विद्यलयाचे पर्यवेक्षक दत्तात्रय हराळ यांनी क्रीडा विशेष सूचना करून यश संपादन करण्यास वेळोवेळी मार्गदर्शन केले.

विद्यलायचे प्राचार्य अण्णासाहेब अडांगळे व जेष्ठ शिक्षक पंढरी बेनके,बाळासाहेब नाईकवाडी, बाबासाहेब पोखरकर, रुपगिर गोसावी, विकास शिंदे,भोरुंडे डी. पी.,बाळासाहेब सहाणे ,मुकेश पवार, भीमाशंकर भोजने, जयराम उगले,शहाजी मुंतोडे, संतोष गोडे, गणेश कदम, धराडे ए. आर., नवले एम. जी।,बरकडे एस.यु.,ठोकळ ए. एस, व श्रीमती पुष्पा गावडे, मोनिका सहाणे, नैना गायकवाड, मुटकुळे ए. पी., व स्कुल कमिटी चे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील कामगिरी साठी शुभेच्छा दिल्या.

Website Title: Latest News District level selection of Agasti School

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here