Home अकोले लॉकडाऊनच्या काळात नोकरदारांना पगार द्यावेत: मुकेश कांबळे

लॉकडाऊनच्या काळात नोकरदारांना पगार द्यावेत: मुकेश कांबळे

अकोले: करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत नोकरांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करावा व पगार द्यावेत असे आदेश अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व अकोले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना दिले आहे. त्यांची दाखल घेत अकोले नगरपंचायतीने संभांधित मालकांना नोटीसा बजावून अंमलबजावणी सुरु केली आहे.

लॉकडाऊनच्या काळात अकोले तालुक्यातील वेगवेगळी हॉटेल, दुकाने, कापड दुकाने, उद्योग, मोल्स, विनाअनुदानित शिक्षक मिल्स याठिकाणी जे काम करीत आहे त्यांचे अतिशय हाल होत आहे. हे विचारात घेऊन भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या कामगार विभागाने पत्र काढून मालकांनी आपल्या आस्थापनेत काम करणाऱ्या कामगारांचे पगार कापू नयेत व पूर्ण पगार द्यावेत असे आदेश दिले आहेत. या पत्राच्या आधारे अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी नगरपंचायत व गटविकास अधिकारी यांना सर्व आस्थापनांना आपल्याकडील सर्व कामगारांना वेतन व जीवनावश्यक साहित्य द्यावे असे आदेश द्यावेत असे पत्र दिले.

या पत्राच्या आधारे नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पटेल यांनी अकोले शहरातील १२८ आस्थापनांना पत्र दिले व नोकरदारांचे पगार व जीवनावश्यक साहित्य द्यावे असे आदेशित केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात सर्व आस्थापनांनी जबाबदारी घेऊन मानवतेच्या भावनेने मदत करावी व वेतन द्यावे असे आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सर्व अस्थापनाना केले आहे.  

Website Title: Latest News Employees should be paid Mukesh Kamble

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here