Home अहमदनगर लॉकडाउन झुगारून एका लग्नाचा बस्ता, अठरा जणांवर गुन्हा दाखल

लॉकडाउन झुगारून एका लग्नाचा बस्ता, अठरा जणांवर गुन्हा दाखल

पाथर्डी/जि.अहमदनगर: पाथर्डी शहरातील एका प्रतिष्ठित कापड दुकानदाराने लॉकडाउनचे सर्व नियम झुगारून एका लग्नाचा बस्ता आपल्या दुकानात बांधण्यास सुरुवात केली आहे. मात्र, याबाबत प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांना माहिती समजताच त्यांनी पोलिस प्रशासनाच्या मदतीने बस्ता बांधणाऱ्या  कापड दुकानदार व इतर १७ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

राज्यात सगळीकडे लॉकडाउमुळे बाहेर पडण्यास व गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे संबंधित दुकानदाराने व लग्न कार्य करणार्यांनी उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

पाथर्डी शहरातील मुख्य बाजारपेठेत आंनद मारुतराव फासे यांच्या मालकीच्या श्रीराम कलेक्शन या दुकानात एका लग्नाचा बस्ता बांधण्याची काम सुरु असताना याची माहिती प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांना समजताच त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक वसंत पवार यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांसह कापड दुकानावर छापा टाकत दुकानात आनंद फासे व त्यांचे दोन कर्मचारी व लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी नवरा व नवरी तसेच नवरीकडचे पंधरा नातेवाइक उपस्थित होते. लग्नासाठी आवश्यक असणाऱ्या कपड्यांची खरेदी ते करीत असल्याचे आढळून आले. सर्वांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला नेण्यात आले. तेथे त्यांच्याविरोधात करोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जे आदेश दिले आहेत, त्या आदेशांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा पोलिस कॉन्स्टेबल जे. बी. बांगर यांच्याकडून दाखल करण्यात आला.  

Website Title: Latest News wedding bag with a lockdown

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here