Home अहमदनगर प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या भावाचाच खून

प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या भावाचाच खून

पैठण: पैठण शहरात रविवारी स्कूल बस चालकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याचे उघड झाले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण व पैठण पोलिसांनी २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावून आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने सक्ख्या भावाचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी विठ्ठल लोखंडे वय ४० रा. पाच पिंपळ गल्ली पैठण असे या मयताचे नाव आहे. तर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव गोरख लोखंडे असे आहे. शिवाजी लोखंडे याचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती.

याप्रकरणी पोलीस तपास करीत असताना अहमदनगर जिल्ह्यातील राहता येथे राहणारा मयताचा लहान भाऊ गोरख लोखंडे हा घटनेच्या दिवशी पैठण येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता मयत शिवाजी यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. तो आमच्या प्रेमसंबंध मध्ये अडथळा ठरत असल्याने त्याचा खून केल्याचे सांगितले. याप्रकरणाचा अवघ्या २४ तासांत पोलिसांनी छडा लावून आरोपीस जेरबंद केले.

Website Title: Murder of a brother who is a barrier to love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here