Home संगमनेर संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यातून आईने वाचविले मुलाचे प्राण

संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यातून आईने वाचविले मुलाचे प्राण

संगमनेर:  पायात भरलेल्या काटा काढण्यासाठी खाली वाकलेल्या ७ वर्ष मुलावार बिबट्याने हल्ला करत त्याला शेतात ओढत नेल्याची घटना तालुक्यातील सुकेवाडी गावाच्या शिवारात महादेव वस्ती येथे घडली. या मुलाच्या आईने बिबट्याच्या मागे धाव घेत आरडाओरडा सुरु करून बिबट्याच्या तावडीतून मुलाला सोडवत त्याचे प्राण वाचविले. ही घटना रविवारी दिनांक १९ रात्री ९ च्या सुमारास घडली.

सुनील नामदेव चव्हाण असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे तर सुरेखा चव्हाण असे या मुलाच्या आईचे नाव आहे. सुनीलला शौचास लागल्याने सुरेखा या त्याला घेऊन घराबाहेर गेल्या होत्या. येताना सुनीलच्या पायात काटा भरला तो काढण्यासाठी खाली वाकलेल्या सुनिलवर लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करत जबड्यात त्याची मान धरत जवळच असलेल्या शेतात ओढत नेले.

बिबट्या मुलाला झपाट्यात धरून नेत असल्याचे पाहिल्यानंतर सुरेखा यांनी त्याचा मागे घेत मोठ मोठ्याने आरडाओरडा केला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील काही नागरिक आवाजाच्या दिशेन धाव घेत नागरिकांच्या ओरडण्याच्या आवाजाने बिबट्याने सुनीलला तेथेच टाकून पळ काढला. सुनीलची मान हात पाय व बोटाला बिबट्याचे दात व नखे लागल्याने त्याच्या जखमा झाल्या आहेत. तो गंभीर जखमी झाल्याने सुनीलला उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच वनपाल अंबादास मेहेत्रे, प्रशांत पुंड, यांनी तत्काळ रुग्णालयात व घटनास्थळी भेट दिली. सुनीलची प्रकृती सध्या स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.  

Website Title: Latest News Mother saves baby from Bibatya attack

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here