Home महाराष्ट्र Latest News: अखेर मोदींवरील वादग्रस्त पुस्तक मागे

Latest News: अखेर मोदींवरील वादग्रस्त पुस्तक मागे

मुंबई: पंतप्रधान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी यांच्याशी करणाऱ्या पुस्तकाला देशभरातून जोरदार विरोध होत आहे. त्यानंतर अखेर हे पुस्तक मागे घेण्यात आले आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीट करत माहिती दिली. यावेळी त्यांनी पुस्तकाचा आणि भाजपाचा काही संभंध नसल्याचा म्हणत याप्रकरणातून हात झटकण्याचाही प्रयत्न केला.

प्रकाश जावडेकर म्हणाले छत्रपती महाराज महान शासक होते, लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतर त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होणार नाही. नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा भाजपशी काहीही संभंध नाही. भाजपचा कार्यक्रमाचाही संभंध नाही. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले. हा वाद आता संपला आहे.  

Website Title: Latest News Finally the controversial book on Modi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here