मानवाच्या स्वार्थी वृत्तीने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान: डॉ. श्रीहरी पिंगळे
अकोले: मानवाच्या स्वार्थी वृत्तीने पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून त्याचे भयानक परिणाम आपणास भोगावे लागत आहेत असे मत संगमनेर महाविद्यालयाचे प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. श्रीहरी पिंगळे यांनी व्यक्त केले.
ते संगमनेर तालुका भूगोल अभ्यास मंडळाने कळसेश्वर देवस्थान ट्रस्टचे सभागृहात आयोजित ३१ व्या भूगोल दिन कार्यक्रम प्रसंगी बदलते पर्यावरण या विषयावर मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सोन्याबापू वाकचौरे हे होते.
प्रा. पिंगळे पुढे म्हणाले की, मानवाने पिण्याच्या पाणी, साहित्याचे पॅकिंगसाठी, दैनंदिन बाजारात प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर केला पण हे प्लॅस्टिक कुजत नसल्याने जमीनीवर साठून अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. शेती उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खते, रासायनिक औषधांचा वापर वाढल्याने जमीनीतील आवश्यक घटकांचे प्रमाण कमी होत आहे. मानव हाचऔषधे फवारलेलेअन्नधान्य, भाजीपाला आहारात वापरतो व त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होऊन कॅन्सर, वंध्यत्व, प्राणघातक विविध आजारांना निमंत्रण दिले आहे. मानवाने पृथ्वीवरील निसर्गात हस्तक्षेप करणे थांबविले तरच मानव सुखाने राहू शकेल.
कार्यक्रमास सरपंच सौ. योगिता वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, पोलीस पाटील गोपीनाथ ढगे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वाकचौरे, बाळासाहेब शिर्के, आदर्श शिक्षक भारत वाकचौरे,संगमनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अरविंद कडलग, ग्रामविकास अधिकारी भोर साहेब, जिल्हा परिषद केंद्र शाळा कळस च्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती शिंगोटे मॅडम, कळसेश्वर विद्यालयाचे शिक्षक श्री. नाईकवाडी इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूगोल मंडळाचे अध्यक्ष शांताराम डोंगरे व पाहुण्यांचा परिचय सल्लागार वेणूनाथ ठोंबरे यांनी करुन दिला. सूत्रसंचालन सचिव प्रा. अमोल वर्पे यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष के. जी. वाकचौरे यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजना साठी कार्याध्यक्ष आर एम खतोडे, खजिनदार जी. एस राऊत,मुख्याध्यापिका अलका आहेर, कैलास कानवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Website Title: Latest News Dr shrihari Pingale