Home अकोले युवकांच्या फावल्या वेळेचा उपयोग राष्ट्रहितासाठी  करावा: नितीनभाऊ मोरे

युवकांच्या फावल्या वेळेचा उपयोग राष्ट्रहितासाठी  करावा: नितीनभाऊ मोरे

अकोले (विद्याचंद्र सातपुते):  देशामध्ये युवकांचे प्रमाण जास्त असून तेच देशाचे आधार स्तंभ आहेत. त्यांना युवा प्रबोधन शिबिरातून योग्य असे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. युवकांच्या फावल्या वेळेचा उपयोग राष्ट्रहितासाठी करण्यात यावा, असे प्रतिपादन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे युवा प्रबोधन विभागाचे प्रमुख नितीन भाऊ मोरे यांनी केले.

अकोले येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने  राजमाता जिजाऊ जयंती,  स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून युवा प्रबोधन विभागाअंतर्गत युवा महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात हजारो उपस्थित युवक, युवतींना तसेच पुरुष व महिला सेवेकरांना मार्गदर्शन करतांना नितीनभाऊ मोरे बोलत होते.

यावेळी केंद्रामध्ये सुरु करण्यात आलेल्या प.पू मोरे दादा अध्यात्मिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा अभ्यासिकेचे उदघाटन नितीन मोरे यांचे शुभहस्ते करण्यात येऊन त्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी नितीनभाऊ मोरे यांचा तालुका प्रतिनिधि सौ अनिता रासने, सौ संगीता बेनके,नवनाथ गुंजाळ,गणेश मादास यांनी, तसेच अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सेक्रेटरी यशवंत आभाळे, संपत मालुंजकर यांनी व अकोले नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्षा सौ संगीता शेटे यांनी सत्कार केला.  यावेळी बालसंस्कार विभागातील विद्यार्थींनी नेपाळ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भरत नाट्यम नृत्यस्पर्धेत भक्ती रत्नपारखी व आर्या भालेराव यांनी सुवर्णपदक मिळविले, तसेच दिल्ली येथे झालेल्या मल्लखांब स्पर्धेत आश्विनी काळे हिच्या मार्गदर्शनाखाली संतोषी चौधरी, अनुष्का धुमाळ व देवांशी वाकळे यांनी सुवर्णपदक मिळविले. यावेळी त्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यास सर्वांनी टाळ्याच्या गजरात कौतुक केले.

 यावेळी नितीनभाऊ मोरे पुढे म्हणाले की,बालसंस्कार हा अतिशय महत्वाचा भाग असून त्यानंतरची पुढील पायरी ही युवा प्रबोधनाची आहे.युवकांची सर्व गुण संपन्न पिढी घडविणे ही सर्वांची जबाबदारी आहे. शिबिरातून प्रात्यक्षिकावर व व्यवहार ज्ञानावर भर देणे आवश्यक आहे. युवकांमध्ये भावनिक जाण निर्माण होणे गरजेचे आहे. विज्ञान युगाला सामोरे जाताना युवकांनी संशोधन वृत्ती ठेवली पाहिजे, त्यांच्यात अंधश्रद्धा नसावी, डोळस श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. युवकांची चळवळ राबविणे गरजेचे आहे. आज भारतात 30 ते 35  कोटी युवक आहे .मात्र त्यांचे चित्र विदारक आहे. गुन्हेगारीकडे युवकांचा कल वाढत आहे.ही चिंतेची बाब आहे. युवकांना योग्य दिशा दाखवावी लागणार आहे, त्यांना चांगल्या कामात गुंतवावे लागणार आहे. आजची शिक्षणपद्धतीमध्ये संस्कार,चारित्र्य यांचा समावेश आवश्यक आहे. शेती व्यवसायात कमी शिकलेले युवक पर्याय नाही म्हणून आल्याने शेती व्यवसायाचे नुकसान होत आहे. आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय केला पाहिजे. युवकांना यश आले तर ते नेतृत्व करु शकतात व अपयश आले तर मार्गदर्शन करु शकतात. पाश्चिमात्य संस्कृतीच्या मागे युवक जात असल्याने त्यांचा वैचारिक गोंधळ  झाला आहे . युवा शिबिरातून करियर मार्गदर्शन,व्यक्तिमत्त्व विकास,स्वसंरक्षणाचे धडे, स्वयं रोजगार मार्गदर्शन, कायदेविषयक जागृती इत्यादीचे मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. युवकांच्या समस्या सोडविल्या तरच देशाच्या समस्या सुटू शकतात, असे श्री.मोरे म्हणाले.

यावेळी नितीन मोरे यांनी स्तोत्रमंत्र, यज्ञयाग, औदुंबर प्रदक्षणा, आई वडीलांचे दर्शन यांचे या मागील विज्ञान समजावून सांगितले. पूर्वी शाळेतून विद्यार्थ्यांना कान पकडून उठबश्या मारण्यास सांगून शिक्षा केली जात असे. त्याचे मागील विज्ञान पाश्चीमात्य देशांनी शोधून काढून त्याला सुपर ब्रेन योगा असे नाव देवून मुलांकडून प्रात्यक्षिक करुन घेत जात आहे. 5 हजार वर्षांपूवी अगस्ति ऋषिंनी बॅटरीचा शोध लावला, खया अर्थाने पूर्वीचे ऋषिंमुनी संशोधन शास्त्रज्ञ होते. नव्या पिढीने हे संशोधन समजून घेणे गरजेचे आहे. व ऋषिंनी लिहिलेली ग्रंथसंपदा वैज्ञानिक दृष्टीकोनातून तपासून त्यावर संशोधन करणे आवश्यक आहे.

यावेळी नितीन मोरे यांनी बालसंस्कार व युवाप्रबोधन शिबीर याची सविस्तर अशी माहिती दिली.

या युवा महोत्सवाच्या आयोजनाबाबत प्रास्तविक केंद्राचे प्रतिनिधी संजय हुजबंद यांनी केले. सुत्रसंचालन संभाजी जोंधळे यांनी केले. तर आभार मनाली रासने हिने मानले. शेवटी राष्ट्रगीत होवून महाप्रसादाने या महोत्सवाची सांगता झाली.

चौकट – युवा प्रबोधन शिबीरातून नितीनभाऊ मोरे यांच्या नेतृत्वाखाली

मराठवाडा विभागात व्यसनमुक्ती साठी तीन कि मी इतकी मानवी साखळी तयार करून व्यसनमुक्ती चा संदेश दिला.

गणेशोत्सवानिमित्त नंदूरबार येथे 9000 मुलांनी शाडूचे गणेशमूर्ती तयार करून विश्व विक्रम प्रस्थापित केला.

दुबई येथे हजारो सेवेकरांच्या उपस्थितीत युवा महोत्सव संपन्न झाला.

पुणे विभागात 25000 विद्यार्थ्यांनी सहभागी होवून 786 किल्ले तयार करण्याचा विश्वक्रम प्रस्तापित केला.

55 शाळेमध्ये पर्यावरण पुरक आकाश कंदील बनून प्लॅस्टीक बंदीचा संदेश देण्यात आला.

Website Title: Latest News Shri swami Samarth Nitin More

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here