Home महाराष्ट्र ग्रीन आणि ऑरेज झोनमधील उद्योग अंशतः सुरु होणार: उद्धव ठाकरे

ग्रीन आणि ऑरेज झोनमधील उद्योग अंशतः सुरु होणार: उद्धव ठाकरे

मुंबई: राज्यातील लॉकडाऊनला सहा आठवडे पूर्ण होत आले आहेत. या कालावधीत राज्याचे अर्थचक्र स्तब्द झाले आहे. हे आर्थिक चक्र फिरलच पाहिजे यासाठी करोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी  ग्रीन आणि ऑरेज झोनमधील काही जिल्ह्यातील उद्योगांना परवानगी देण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी फेसबुकवरुन संवाद साधला यावेळी यावेळी करोनाच्या संकटाची जाणीव करून देतानाच राज्यासमोरील आर्थिक संकटाचीही जाणीव करून दिली. हे अर्थचक्र फिरलच पाहिजे. जिल्ह्यातील जिल्ह्यात मालवाहतूक मालाची ये जा करण्यात येईल पण एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. जिल्हा बंदी कायम असणार आहे अस उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कामगारांची कारखान्याच्या आवारात काळजी घेतली तर राज्य सरकारही तुम्हाला मदत करेल असेही ठाकरे यांनी सांगितले. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास परवानगी नाही. ३ मे पर्यंत ही बंदी कायम असेल. मालवाहतूक करायची आहे मात्र व्हायरसची वाहतूक करायची नाही धोका पत्करायचा नाही असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

20 एप्रिल नंतरची अमंलबजावणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 10 (2)(1) लॉकडाऊन नियमावली तसेच मार्गदर्शन तत्वे जाहीर करण्यात आली आहेत. केंद्रीय गृह सचिवांनी याबाबतचे पत्र सर्व राज्य सरकारांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना पाठविले आहे.

प्रतिबंधित क्षेत्र

 विमान, रेल्वे, बस,मेट्रो सेवा,जिल्ह्याबंदी, शैक्षणिक संस्था, हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट, बिअरबार, धार्मिक स्थळे, सामाजिक राजकीय, धार्मिक उपक्रम बंद, अंत्यसंस्कारालाही 20 लोकांच्यावर परवानगी नाही.

हॉटस्पॉटसाठी मार्गदर्शन तत्वे

जिथे कोरोनोचे रुग्ण जास्त प्रमाणात आहेत त्या ठिकाणी मंत्रालयाचे निर्देश लागु असतील, अशा ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

सोशल डिस्टनिसिंगसारख्या मार्गदर्शन तत्वांच्या आधीन राहून अपवाद करण्यात आले आहेत

रुग्णालये, दवाखाने, केमिस्ट, फार्मसी, वैद्यकीय उपकरणे, प्रयोगशाळा, पॅथॉलॉजी लॅब.

कृषी क्षेत्र

सर्व कृषी आणि फलोत्पादनाशी निगडित शेतीची सर्व कामे सुरू राहतील. कृषी प्रक्रिया घटक, कृषी उपयोगी साहित्याची दुकाने, बी बियाणे, खते, कीटकनाशके पुरवठा, वितरण, किरकोळ विक्री केंद्रे.

पशुपालन

दुग्ध प्रक्रिया उद्योगांकडून दुग्ध संकलन, प्रक्रिया वितरण, शेळीपालन, पशुपालन, पशुखाद्य उत्पादन कारखाने, कच्चा मालाचा पुरवठा.

वित्त क्षेत्र

बँका, ए. टी. एम, विमा कंपन्या, वित्तीय बाजार.    

Website Title: Latest News Industries will be partially started

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here