Home अकोले जायनावाडी येथे भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप.

जायनावाडी येथे भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप.

पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी -निरोप घेतो देवा आज्ञा असावी. चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी. आभाळ भरले होते तु येताना, आता डोळे भरून आलेत तुला पाहून जाताना.बाप्पाला शेवटचा निरोप देत गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया अशा गजरात अकोले तालुक्यातील जायनावाडी येथील भैरवनाथ युवा प्रतिष्ठान यांचे वतीने भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला.
याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संपत भांगरे, ग्रामपंचायतीचे सरपंच बाळु डगळे, माजी उपसरपंच बाळू भांगरे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव भांगरे, विलास भांगरे, भाजपाचे काळू भांगरे,युवा नेते सोमनाथ भांगरे, संदिप भांगरे, जेष्ठ नागरीक प्रदिप भांगरे, किसन भांगरे, काळू चौरे, दशरथ भांगरे, नवसु भांगरे, अरूण भांगरे, राजू भांगरे, तुकाराम भांगरे, अशोक भांगरे, सागर डगळे यांसह बहुसंख्य ग्रामस्थ तसेच महिला भगिनी उपस्थित होते.
यावेळी जायनावाडी येथील श्री. स्वामी समर्थ महिला बचत गट यांनीही उपस्थित राहून विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यामुळे कार्यक्रमात अधिक आकर्षण निर्माण झाले. गणेश विसर्जन सोहळा संपन्न करण्यासाठी तरुण मंडळाने बहुमोल परीश्रम घेतले.
Website Title: Latest News Jayanavadi Ganpati

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here