राजूर: महात्मा गांधींजींचे विचार आपण स्वत: आत्मसात केले पाहिजे: अॅड. एम.एन. देशमुख
राजूर: राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांना विश्वात महत्व देण्यात आले आहे. गांधीजींनी नुसते विचार मांडले नाही तर ते स्वतः अंगिकारले. ते विचार आपण स्वत: आत्मसात केले पाहिजे असे प्रतिपादन सत्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. एम.एन. देशमुख यांनी केले. ते गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, राजूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५0 वी जयंती कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
विद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.शरद तूपविहीरे, प्रा.विकास जोरवर, आर. पी. आढळ, रीना राठोड यांनी केले होते. या कार्यक्रमप्रसंगी सत्यानिकेतन संस्थेचे सहसचिव मिलिंद उमराणी, संचालक विजय पवार, प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य एल.पी.पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे, एस.एस.पाबळकर, प्रकाश महाले, अजित गुंजाळ आदी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
Get Latest Marathi News & Sangamner & Akole News from Politics, Crime, Sports, Entertainment and local from all Cities Of Maharashtra.
Website Title: Mahtma Gandhi Celebrate the anniversary