विकासासाठी आपली उमेदवारी: आ. वैभवराव पिचड
अकोले: आपण भाजपामध्ये प्रवेश हा फक्त तालुक्यांची विकास कामे व्हावीत, रखडलेली कामे मार्गी लागावीत यासाठी केला आहे. मुख्यमंत्री फडवणीस यांनी विकास कामे करण्याबबत शब्द दिला आहे. त्यांनी आपणास उमेदवारी देण्याचा शब्द पूर्ण केला आहे. आपली उमेदवारी ही केंवळ विकासासाठी आहे असे प्रतिपादन भाजपचे उमेदवार वैभव पिचड यांनी केले.
अकोले विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी दुपारी पिचड यांनी अर्ज दाखल केला. अडीच वाजण्याच्या सुमारास भाजपाच्या वतीने शक्तिप्रदर्शन करत ढोल ताशे गजरात रॅली काढून निवडणूक अधिकारी उदय किसवे यांच्याकडे अर्ज दाखल केला त्यानंतर सभा झाली. यावेळी सभेला मधुकर पिचड सीताराम गायकर, मधुकर नवले, शिवाजी धुमाळ आदि उपस्थित होते.
Website Title: Latest News candidate for development Vaibhavrao Pichad