Home अकोले धोतर फेडू म्हणणाऱ्यांची बदला जनता घेईल: पिचड

धोतर फेडू म्हणणाऱ्यांची बदला जनता घेईल: पिचड

राजूर (वार्ताहर ): आम्ही भाजपात होतो , आजही आहे , उद्याही राहणार व  तालुक्याच्या विकासासाठी भाजपचे उमेदवार वैभव भाऊ पिचड याना मोठ्या  मताधिक्याने निवडूनच आणणार अशी हमी देत आदिवासी भागातील मुळा , आढळा , प्रवरा व पठार भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येत राजूर येथे  मधुकर पिचड आमदार वैभव पिचड ,जिल्हा बँकेचे अध्यक्ष  सीताराम गायकर भाजपचे जालिंदर वाकचौरे , सीताराम भांगरे , कैलास वाकचौरे , रमेश राक्षे यांच्या उपस्थितीत वज्र निर्धार करीत पत्रकारांनाही आपली भूमिका  विशद केली . 
 आदिवासी भागातील  भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा राजूर येथे आयोजित करण्यात आला होता . या मेळाव्याचे प्रास्तविक भास्कर एलमामे यांनी केले यावेळी बोलताना माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अकोले तालुक्यातील गाव गावातील कार्यकर्ते यांनी माझ्याशी संपर्क साधून आम्ही देशाच्या राज्याच्या व तालुक्याच्या विकासासाठी भाजपमध्येच राहून वैभव पिचड याना निवडून देणार असा निर्धार केला . विरोधक केवळ शिव्या देण्याचे काम आम्हाला करीत असून ते जेव्हढ्या शिव्या देतील तेव्हडे मतदान वाढेल याची खात्री देतो . तर सीताराम गायकर यांचे धोतर फेडू म्हणणाऱ्यांची बदला जनता घेईल . देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता होऊ पाहत आहे त्यामुळे देश महाराष्ट्र बांधणीच्या कमला जनता व तरुण मतदार मत देईल याची खात्री आहे . विरोधक खोटा प्रचार करून पिचड साहेबांची निशाणी घड्याळ आहे असे म्हणतील त्यांना सांगा पंतप्रधान मोदी , मुख्यमंत्री व पिचड साहेबांची निशाणी कमळ आहे व कमळावर बटन दाबून वैभव भाऊला विजयी करा . तर आमदार वैभव पिचड यांनी देश आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवत आहे . गेली ५ वर्षे मोर्चे व रास्ता रोको करण्यापलीकडे काहीच करता आले नाही यापुढे विकास गतीने व्हावा म्हणून भाजपचा हात पकडून मी काम करीत आहे . तर तालुक्यातील जनता प्रामाणिक पणे माझ्या या निर्णयाला साथ देऊन पाठिंबा देत आहे त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो व तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याची खात्री देतो . काशिनाथ दादा साबळे , मुरली अण्णा भांगरे  , रामनाथ भांगरे , सुरेश गभाले , सुरेश भांगरे ,व २०० कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी पाठिंबा जाहीर केला तर राजूर चिचोंडी वारुंघुशी हि मोठे गावे एकत्र आले पंचायत समिती सर्व सदस्यहि मागे राहिले नाही याचा आनंद आहे . यावेळी काशिनाथ साबळे , मुरलीधर भांगरे , मारुती मिच्कर सुरेश गभले , , सौ अलका अवसरकार , सौ सोनाली नाईकवाडी सुरेश भांगरे बाळासाहेब देशमुख , संतोष बनसोडे , गोकुळ कानकाटे , भाऊराव सालकर  , उर्मिला राऊत  देवराम सामेरे , दत्तात्रय बोऱ्हाडे ,रमेश शेंगाळ आदींची भाषणे झाली . त्याचवेळी भाजपने वैभव पिचड यांची उमेदवारी जाहीर केली नि उपस्थितांनी फटाक्याची आतषबाजी करून विजयाच्या घोषणा दिल्या . २०० कार्यकर्त्यांचे सत्कार करण्यात आले तर भाजपच्या वतीने तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे , जालिंदर वाकचौरे यांनी भाजपात आल्याबद्दल पिचड पितापुत्रांचा सत्कार केला . यावेळी कार्यकर्त्यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले कि , 
आम्ही आदिवासी भागातील सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते या निवेदनाद्वारे
सूचित करतो की, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशाला जागतिक पातळीवर क्रमांक एकवर
नेऊन ठेवले असून केंद्रीय योजनांचा लाभ आदिवासी उपेक्षित सर्व सामान्य जनतेला मिळत आहे. तर राज्याचे
मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस यांनी राज्यात आदिवासी शेतकरी, शेतमजूर कामगार, नोकरदार, महिला,
युवक यांना न्याय देऊन उत्कृष्ठ निर्णय घेतले आहे. आम्ही गेली ५ वर्षापासून भाजप पक्षाचे काम करीत असून
या पुढेही आम्ही पक्षाचे काम सुरूच ठेवणार आहे. तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय मधुकरराव पिचड
साहेब यांनी आदिवासी समाजासाठी सतत संघर्ष करून प्रसंगी पदाचा त्याग करून आदिवासी समाजाला
न्याय दिला आहे. तर आमदार वैभवराव पिचड यांनी भाजप पक्षात येऊन पक्षाची प्रतिमा उंचावली आहे.
त्यामुळे राज्यात भाजप युतीचे सरकार येऊन तालुक्यात भाजपचाच आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या रूपाने
मिळणार आहे. आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजप युती सरकारने तालुक्यातील
बारी-कोल्हार रस्ता १४१ कोटी मवेशी-पाडळने 33 केव्हीचे वीज उपकेंद्र राजूर न्यायालय, मवेशी शैक्षणिक
संकुल रस्ता ४ कोटी अशी कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लावले आहेत. तर पंतप्रधान मोदीजी,
मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस यांच्या माध्यमातून भविष्यात अकोले तालुक्याच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने
तोलार खिंड, शहापूर, कोल्हार (चोंढे घाट) रस्ता छोटी मोठी धरणे, उपसा सिंचन योजना,घरकुल मार्गी
लावून तालुक्याच्या विकासाच्या राहिलेल्या प्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक व्हावी याच उदात्त हेतूने व
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेन्द्र्जी फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी अकोले तालुक्याच्या
इतिहासात प्रथमच वैभवभाऊ पिचड यांच्या रूपाने भाजपचा आमदार प्रचंड मताधिक्क्याने निवडून देण्याचा
आमचा मानस आहे. आम्ही सर्वजन भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून या पुढेही पिचड साहेब व वैभवभाऊ
पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे काम करणार आहोत. मात्र तालुक्यातील विरोधक मंडळी आमच्या
बद्दल अपप्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. त्यावर विश्वास ठेऊ नये. तसेच एकास एक
होऊ किंवा एकास दहा होऊ. आम्ही सर्वजण मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेन्द्र्जी
फडणवीस, माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार वैभवभाऊ पिचड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन
तालुक्यात भाजपचा झेंडा विधानसभेवर फडकवू हा विश्वास व्यक्त करतो.
Get  Latest Marathi News &  Sangamner News &  Akole News from Politics, Crime, Sports, Entertainment and local News from all Cities Of Maharashtra.
Website Title: revenge on those who say 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here