Home अकोले अकोलेत माकपची एकास एकला साथ: उमेदवारी अर्ज न भरण्याचा पक्षाचा निर्णय

अकोलेत माकपची एकास एकला साथ: उमेदवारी अर्ज न भरण्याचा पक्षाचा निर्णय

अकोले: पिचडांच्या भ्रष्ट व संधीसाधू राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत पिचडांच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा या लोक भावनेचा आदर करत आज माकपने आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय स्थगित केला. 
कॉ एकनाथ मेंगाळ, कॉ नामदेव भांगरे व कॉम्रेड तुळशीराम कातोरे या तीन उमेदवारांचे अर्ज संपूर्ण पूर्तता करून माकपच्या वतीने तयार ठेवण्यात आले होते. उर्वरित विरोधकांनी एकास एक उमेदवार देण्यासाठी प्रामाणिकपणे काम केल्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षही या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देईल असा शब्द माकपने  दिला होता. दिलेला शब्द पाळत माकपने आज अखेरच्या दिवशीही आपले उमेदवारी अर्ज न भरून तालुक्यातील जनतेच्या मनातील लोकभावनेला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ.किरण लहामटे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
विधान सभेची ही निवडणूक भ्रष्ट व संधीसाधु राजकारणाच्या शुद्धीकरणाच्या दिशेने  तालुक्याला घेऊन जाणारी निवडणूक ठरेल व एकास एकच्या जन भावनेस जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त होईल असा विश्वासही यावेळी डॉ अजित नवले यांनी व्यक्त केला.
माकपच्या या निर्णयामुळे तालुक्यातील राजकारणाची समीकरणे नक्की बदलतील, संधीसाधू आणि उथळ राजकारणाचा पाडाव होईल व  तत्वाधिष्टीत राजकारणाला बळकटी मिळेल असा विश्वास माकपचे जिल्हा सचिव सदाशिव साबळे यांनी व्यक्त केला.
राजकारणाच्या शुद्धीकरणाच्या या लढयात माकपचे गावोगावचे कार्यकर्ते संपूर्ण ताकतीने सामील होतील असे माकपचे तालुका सचिव वकील ज्ञानेश्वर काकड यांनी सांगितले.
 माकपच्या या निर्णयाची माहिती मिळताच डॉ.किरण लहामटे व विनय सावंत यांनी मार्क्सवादी कार्यालयात येऊन या निर्णयाचे  स्वागत केले व माकपच्या तिन्ही इच्छुक उमेदवारांचे आभार मानले.
Website Title: Latest News Makapa Party not declared candidate in akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here