Home अकोले अकोलेत पिचड व लहामटे यांच्यात चुरशीची लढत: मात्र पिचड यांची प्रचारात आघाडी

अकोलेत पिचड व लहामटे यांच्यात चुरशीची लढत: मात्र पिचड यांची प्रचारात आघाडी

अकोले: अकोले मतदारसंघातून भाजपकडून वैभव पिचड व राष्ट्रवादीकडून डॉ. किरण लहामटे या प्रमुख उमेदवारांसह सात उमेदवार रिंगणात आहे. मात्र याठिकाणी खरी लढत ही वैभव पिचड व डॉ. किरण लहामटे यांच्यात रंगणार असून या पारंपारिक लढतीकडे संपूर्ण अकोले तालुक्याचे लक्ष लागले आहे.

अकोले मतदार संघात राष्ट्रवादीमधून वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. तर भाजपमधून डॉ. किरण लहामटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करत उमेदवारी केली आहे. हे दोन्हीही उमेदवार पारंपारिक स्पर्धक असून आता केवळ पक्ष बदलले असले तरी त्यांच्यात पुन्हा एकदा लढत रंगणार आहे. पिचड यांची कामे व जनसंपर्क, सत्ताधारी पक्षाचे पाठबळ, कार्यकर्त्यांची फौज यामुळे पिचड यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. तर लहामटे यांनी नाराजीची मोठ बांधत मित्रपक्षांना सोबत घेऊन प्रचार सुरु केला आहे. माकपने आपला पाठींबा किरण लहामटे यांना जाहीर केला असला तरी शिवसेना भाजप व पिचड यांना मानणारा मोठा वर्ग तालुक्यात असल्याने वैभव पिचड यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.   

Website Title: Latest News election of Akole constituency 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here