Home अकोले अकोले: ममताबाई भांगरे यांचे सेंद्रिय शेतीचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले

अकोले: ममताबाई भांगरे यांचे सेंद्रिय शेतीचे संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकले

पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी(सचिन लगड)- भारत सरकारचे   विज्ञान आणि तंत्रज्ञान ,भूमी विज्ञान ,आरोग्य आणि कुटुंब कल्याण या तिन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाचव्या भारतीय आतंरराष्ट्रीय विज्ञान मोहत्सवाचे आयोजन पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे करण्यात आले होते .या उत्सवात देवगावच्या ममताबाई भांगरे यांना निमंत्रित करण्यात आले होते .महिला वैज्ञानिक आणि उद्योजक संमेलनात त्यांनी सहभाग घेतला .
   ममताबाई भांगरे या अकोले तालुक्यातिल दुर्गम आदिवासी भागातील देवगाव येथील रहिवासी आहेत . त्यांचा बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेशी वर्ष 2013 मध्ये जनरल मिल्स या कंपनीने पुरस्कृत केलेल्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमाने संपर्क झाला . या प्रकल्पाच्या माध्यमाने त्यांनी आपला मोर्चा शेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळवला . प्रकल्पाने त्यांना  गांढूळ खत निर्मिती साठी शास्त्रीय पद्धतीने  प्रशिक्षण दिले . पुढे त्यांनी उत्तम रीतीने गांढूळ खत निर्मिती केली आणि भात शेताला वापरले परंतु हे खत जोराचा पाऊस आला आणि पाण्यासोबत ते वाहून गेले . त्यांना प्रश्न पडला की मेहनतीने तयार केलेले   गांढूळ खत वाहून जाणार असेल तर त्याचा उपयोग पिकांना कसा होणार ? बांधावर त्या बसल्या-  बसल्या छोटे दगड शेतात नैराश्याने फेकत होत्या . त्यापैकी एक दगड थेट भात शेतातील चिखलात जाऊन रुतला . त्यानंतर त्यांच्या मनात एक विचार डोकावला की मी जर   गांढूळ खताच्या छोट्या गोळ्या तयार करून त्या दोन रोपांच्या मध्ये गाडून दिल्या तर खत वाहून जाणार नाही आणि त्याचा थेट मुळाना पुरवठा होईल . त्यानुसार त्यांनी मोठ्या प्रमाणावर   गांढूळ खताच्या गोळ्या तयार केल्या व भात शेतात यशस्वीपणे वापरल्या . त्यापासून त्यांना रासायनिक खत न वापरता भात शेती शेंद्रिय पद्धतीने पिकवली.पुढे त्यांनी याच गोळ्यामध्ये परस बागेत लागवड करन्यासाठी लागणाऱ्या विविध भाजीपाला पिकांच्या बिया मध्ये घालून या गोळ्या रोपन केल्या . बियाणे या गोळ्यांमधून उत्तम रीतीने उगवल्याचे त्यांच्या लक्षात आले .पुढे या तंत्राचा वापर त्यांनी नियमित पने करून आपली परसबाग फुलवत ठेवली . या त्यांनी केलेल्या प्रयोगांचे व या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन  त्यांना कोलकत्ता येथील विज्ञान मोहत्सवासाठी आमंत्रित करण्यात आले होते .त्यांचा हा शेंद्रिय शेतीमध्ये केलेला यशस्वी प्रयोग व कार्य याचे सादरीकरण ममताबाई व बायफचे विभाग प्रमुख जितीन साठे यांनी सर्वांसमोर केले.या कार्यक्रमात डॉ.हर्ष वर्धन मंत्री –  भारत सरकार यांनी ममताबाई यांच्या कार्याची प्रशंसा केली .  राज्य सभेच्या सदस्या रूपा गांगुली यांनीही त्यांच्या कार्याचा गौरव केला  .ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुणे येथील डॉक्टर लीना बावडेकर  व  बाळासाहेब मुळे यांनी विशेष प्रयत्न केले . बायफचे राम कोतवाल ,योगेश नवले ,लीला कुऱ्हे,रोहिदास भरीतकर ,राम भांगरे यांनी वेळोवेळी ममताबाई यांना मार्गदर्शन केले .
Website Title: Latest News mamatabai Bhangare sanshodan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here