Home अकोले अकोलेत ही पूर्तता केल्यास एम.आय.डी.सी. होईल

अकोलेत ही पूर्तता केल्यास एम.आय.डी.सी. होईल

अकोले: अकोले तालुक्यात एम.आय.डी.सी. होण्याची मागणी सातत्याने होत आहे. तथापि त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न व पत्रव्यवहार हा ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अहमदनगरचे जिल्हाउपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, अकोले तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, तालुका सचिव दत्ता रत्नपारखी यांनी शासन दरबारी पाठपुरवा करून शासनाकडे मागणी केली. त्यावर एम.आय.डी.सी. अकोल्यात होईल पण त्यासाठी योग्य जागा, त्या जागेचा गाव नकाशा, संभधीत खातेदाराचे ७/१२ उतारे इत्यादी गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे नाशिकचे प्रादेशिक अधिकारी यांनी पत्रात म्हंटले आहे.

नाशिकचे प्रादेशिक अधिकारी यांनी पत्र क्रमांक भूसंपादन/अकोले डिवाई ३०९ /२०१९ ने ग्राहक पंचायतला कोणत्या कागद पत्रांची आवश्यकता आहे. त्याबाबत कळविले आहे. संबंदिन्ताशी साधलेल्या संपर्कानुसार व केलेल्या पत्रव्यवहारावरून तालुक्यामध्ये नैसर्गिक साधन संपती म्हणजेच जागा, पाणी, जमीन, रस्ते, वीज या गोष्टी मुबलक प्रमाणात आहे. एम.आय.डी.सी.  साठी एखाद्या गावाने जागा जमीन उपलब्ध करून दिल्यास त्याठिकाणी वीज, पाणी, व रस्त्यांची उपलब्धता हि शासकीय पातळीवरून करून घेता येऊ शकते. तथापि त्यासाठी प्रथम तालुक्यात जमिनीची उपलब्धता होणे अवाश्यक आहे.


जाहिरात: साईनिवारा इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर

शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536


एम.आय.डी.सी.साठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्याचे लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, सीताराम भांगरे, दत्ता शेणकर, महेश नवले, दत्ता रत्नपारखी अशोक मंडलिक, आनंदा डावरे आदींनी केले आहे.   

Website Title: Latest News MIDC in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here