Home अकोले अकोले तालुका विकासाचे रोल मॉडेल आणि आराखडा बनविणार:  आ.डॉ. किरण लहामटे

अकोले तालुका विकासाचे रोल मॉडेल आणि आराखडा बनविणार:  आ.डॉ. किरण लहामटे

कोले: अकोले तालुक्यात डॉ. किरण लहामटे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आ. लहामटे म्हणाले की, अकोले तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. पावसाने तालुक्यातील संपूर्ण शेतीच उद्वस्त केली आहे. तालुक्यात ३५ हजार ९४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यापैकी ७० टक्के क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी.  तालुक्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. असा परिस्थितीत प्रशासनाने तातडीने पंचानामे केले असून याप्रश्नी आपण जिल्हाधीकार्यांशी देखील बोललो आहे. त्यांनी त्यास चांगला प्रतिसाद दिल्याने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी मदतच होईल. सातबारयावर पिक पाहणी नुसारच पंचनामे करण्यात आले आहेत असा विश्वास व्यक्त करताना तालुक्यात झालेल्या रस्त्याच्या प्रश्नी आपण लक्ष घातले आहे. त्यामुळे रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे कामही सुरु झाले आहे. आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमांतूनही तालुक्यातील रस्त्यांसाठी आपण निधी आणू,  कोल्हार घोटी राज्यमार्गाचेही काम युद्ध पातळीवर सुरु करण्याचे आदेशहि आपण दिल्याचे ते म्हणाले. . कौठ्वाडी सारख्या ठिकाणी अद्याप बस जात नाही. तिथेही लवकरच बस सुरु करण्यासाठी प्रयत्न करू. तालुक्यात अनेक शासकीय कार्यालयामध्ये अनेक पदे रिक्त असून त्यासाठी प्रयत्न करू. आरोग्य विभागाचे काम गतीनेच सुरु करताना रिक्त पदांचाही प्रश्न मार्गी लाऊ. तरुणानाच्या हाताला काम मिळावे यासाठी एमआयडीसी चा प्रश्न पाठपुरावा करून सोडवू, जिथे वीज अजून पोहोचली नाही तिथे पोहचायचे काम करणार आहे.

तालुक्यातील प्रश्नांशी आपली बांधिलकी असून तालुका हे आपले कुटुंब आहे. जानेवारी महिन्यात आपण तालुक्याची आम सभा आपण बोलावणार असून थेट जनतेशी संवाद साधणार आहे. तालुक्यातील संस्थांच्या कारभारातही आपण लक्ष घालू, अकोले तालुक्यातील अवैध धंदे बंद करावेत यासाठीही आपण पोलिसांना सांगितले असून तसे न झाल्यास वरिष्ठांकडे आपण तक्रार करू.

अकोले तालुक्यातील लोकांनी जेवढी भरभरून मते आपल्या पदरात टाकली, त्यानंतर आपण आभारासाठी फिरताना सत्कार झाले. मोठा प्रतिसादही मिळाला. पण लोकांनी अपेक्षा तेवढ्याच आपल्याकडून ठेवल्या असून अपेक्षांचे हे ओझे घेऊन आपण वाटचाल करीत असतना लोक विकासाची कामे आपल्याला करावी लागणार आहेत. असेही आ. डॉ. किरण लहामटे यांनी म्हंटले आहे.

तालुक्यात यापुढे होणाऱ्या शिखर संस्था निवडणुकीतही आपण लक्ष घालू, हे करताना आपल्याला तालुका विकासाचे रोल मॉडेल  बनवायचे असून त्यांचा विकास आराखडाही आपण बनविणार असल्याचे लहामटे यांनी सांगितले.

Website Title: Latest News Role model of development of Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here