Home अकोले आरोटे परीवाराचे नांव सातासमुद्रापार , शिक्षणासाठी  अमेरिकेला प्रांजल आरोटे हीची उच्च शिक्षणासाठी...

आरोटे परीवाराचे नांव सातासमुद्रापार , शिक्षणासाठी  अमेरिकेला प्रांजल आरोटे हीची उच्च शिक्षणासाठी निवड

अकोले:  आरोटे परीवाराचे नांव सातासमुद्रापार नेवुन उच्च शिक्षणासाठी यापूर्वी जाणाऱ्या विद्यार्थ्यांत मुलांचा भरणा अधिक होता.पण आज आरोटे परीवारातील कन्या ही  परदेशी जात आहेत ही अतिशय समाधानाची बाब आहे.आदिवासी अकोले सारख्या ग्रामीण भागातील प्रांजल आरोटे ही पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी मिशिगन विद्यापीठात जात आहे ही अकोले तालुक्याच्या व आरोटे परीवाराचे दृष्टीने भूषणावह बाब असल्याचे मत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी कौंटुबिक सत्कार सोहळ्यात बोलताना व्यत केले 
    पत्रकार संघाच्या वतीने  कु. प्रांजल रमेश आरोटे ही पदव्युत्तर शिक्षणासाठी (एम. एस.)अमेरिकेला जात आहे. त्याबद्दल तिचा  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, दैनिक गांवकरी , दैनिक जनप्रवास, दैनिक सांज महानगरी परीवाराचे वतीने काल सत्कार करण्यात आला यावेळी वडील, मातोश्री,बंधु उपस्थित होते 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नेहमी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थ्यांनीचा सन्मान करणे हे  काम करणाऱ्या पत्रकार संघाला उज्जवल परंपरा आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकी ची थाप टाकण्यासाठी प्रांजल हीचा 
सदिच्छा समारंभ करताना तिची प्रेरणा अन्य विद्यार्थी घेतील हा  कु. प्रांजल ही पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिका येथे जात असतांना तिने जे ध्येय्य मनाशी बाळगले आहे,ते  शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती मायदेशी आल्यावर होणारा पहिला सत्कार हा पत्रकार संघ करेल अशी भावना व्यक्त केली.
Website Title: Latest News Name of the family of Arote 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here