Home अकोले पिंपळगाव नाकविंदा ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.

पिंपळगाव नाकविंदा ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.

ग्रामसेवक जानेकर यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचा ठराव.
पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी –अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन आढळ यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
यावेळी ठक्करबाप्पा आदिवासी विकास कार्यक्रमा अंतर्गत दशक्रियाविधी बांधकाम करणे तसेच दत्त मंदिर ते दशक्रिया विधी रस्ता काँक्रीटीकरण करण्याबाबत बहुमताने ठराव संमत करून मंजुरीसाठी राजुर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पास पाठवण्याची शिफारस करण्यात आली.
तसेच गावातील शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, मुख्यमंत्री पेयजल योजना, वृक्षारोपण, हागणदारी मुक्त गाव यांसारख्या ग्राम विकासाबरोबरच गावाची संपत्ती सुरक्षीत ठेऊन गावाचे वैभव संपादन केल्यामुळे ग्रामसेवक गौतम जानेकर यांना त्यांच्या कृतीशिल कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन गौरव करावा. असा ठराव ग्रामसभेत एकमताने करण्यात आला.
याप्रसंगी सरपंच सुमन आढळ, उपसरपंच सुनिता बगनर, सदस्य विश्वास पथवे, नवनाथ बगाड,दशरथ बगनर, उज्वला लगड,ग्रामसेवक गौतम जानेकर, कामगार तलाठी सचिन मांढरे, कोतवाल सुनिल गायकवाड, वनरक्षक एन.डी. कोळी, आरोग्यसेवक बी.एल. यादव, आरोग्य सेविका जे.पी. कासार, पाणी वाटप समितीचे अध्यक्ष माधव बोऱ्हाडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वाळीबा लगड, नामदेव लगड, नवनाथ लगड, मारूती आभाळे, राधाकिसन लगड, भास्कर बगनर, सुभाष आभाळे, आंबादास बोऱ्हाडे, नितिन लगड, भास्कर गावंडे, देवा मेंगाळ, रावसाहेब लगड, पंढरीनाथ बगनर, सुरेश बिन्नर, गणेश बगनर, भाऊपाटील बगनर, हरीभाऊ आढळ, गोपीनाथ बगनर, प्रविण वाघ, देवराम बगनर, गुलाब गायकवाड, अंगणवाडी सेविका सुमन आभाळे यांसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामसभेत गायरान हद्दीतील बांधकाम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, ड्रोन सर्वेक्षणाची माहीती, ई- ग्राममधील अडीअडचणी, ग्राम पंचायत हद्दीतील इमारत नोंदी, ग्रामस्वच्छता अभियान, हागणदारी मुक्त गाव दुसऱ्या टप्यातील तपासणी, मागासवर्गीय निधीबाबत माहीती, ग्रामपंचायत कर वसुली, घनकचरा व्यवस्थापन, घरकुल योजना लाभार्थी प्रस्ताव, वृक्ष लागवड संगोपण, १४वा केंद्रीय वित्त आयोग निधीतील कामे, माहीतीचा अधिकार, शासनाच्या विविध योजना यांसारख्या कामांबद्दल सादक, बाधक चर्चा करून योग्य त्या उपाययोजना सुचवण्यात आल्या. शेवटी देवराम बगनर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Website Title: Latest News Pimpalgaon Nakvinda Gramsabha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here