Home अकोले मुख्यमंत्र्याचा संगमनेर,अकोले,राहुरी दौरा रद्द

मुख्यमंत्र्याचा संगमनेर,अकोले,राहुरी दौरा रद्द

अकोले: भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री अरुण जेटली यांचे आज शनिवारी निधन झाल्याने मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी नगर जिल्ह्यात संगमनेर, अकोले, राहुरी येथे होणाऱ्या त्यांच्या जाहीर सभा रद्द करण्यात आल्या आहेत.

महापूर, माजी मंत्री सुषमा स्वराज यांचे निधन, महापूर व आता अरुण जेटली यांचे निधन यामुळे मुख्यमंत्र्यांना आपला दौरा तिसऱ्यांदा रद्द करावा लागला आहे. सातत्याने नगर जिल्हा दौरा रद्द होत असल्याने प्रशासनासह कार्यकर्त्यांमध्ये सम्ब्र्हम निर्माण झाला आहे. दौऱ्याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसून ती लवकरच जाहीर करण्यात येईल असे भाजपाच्या सूत्रांनी म्हटले आहे.

Website Title: Latest News CM Devendra Phadavanis 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here