Home अकोले अकोले: अभिनवच्या विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्तांना मदत.

अकोले: अभिनवच्या विद्यार्थ्यांकडून पूरग्रस्तांना मदत.

अकोले: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर,सांगली, सातारा : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला   अनेकांचे संसार उध्वस्त झाले. त्यांना मदतीचा हात म्हणून अभिनव शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांनी  व कर्मचाऱ्यांनी आर्थिक मदत केली. सदर मदत अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीने वसुंधरा अकॅडेमीचे प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर, मारुतीराव कोते  अभिनव पब्लिक स्कूल च्या   प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव , एम.बी.ए. चे डॉ.  किरण गोंटे ,  प्रा.अनिल बेंद्रे आणि अभिनव कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य मिलिंद आरोटे हे प्रातिनिधिक स्वरुपात   उपस्थित होते.यावेळी तहसीलदार   मुकेश कांबळे    यांनी अभिनव शिक्षण   संस्थेने सामाजिक  जाणीवेतून केलेली  मदत    स्वागतार्ह आहे असे नमूद केले व शासनाच्या वतीने आभार व्यक्त केले .

Website Title: Latest News Akole Assistance to flood victims by Abhinav

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here