Home अकोले राजूर: सर्वोदय विद्यालयात श्रावणधारा व दहीहंडी उत्सव साजरा

राजूर: सर्वोदय विद्यालयात श्रावणधारा व दहीहंडी उत्सव साजरा

राजूर: मुले म्हणजे देवाघरची फुले लहानपणातच मुलांना सर्व विषयांविषयी माहिती असली पाहिजे त्या दृष्टीने अहवाल सालातील प्रत्येक सण उत्सव शाळेमध्ये मुलांना करून दाखवत मुलांनी देखील भविष्यकाळात सण उत्सव मनी रुजावे यासाठी गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात श्रावणधारा व  दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व आपल्या विद्यालयाच्या परिसरात गोविंदा आला रे आला या गाण्याच्या तालावर ठेका धरत दहीहंडी फोडून सर्व विद्यार्थ्यांनी या उत्सवाचा आनंद घेतला.

यावेळी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान करत वृंदावनातील गवळण, शेतकरी, गुराखी यांची वेशभूषा परिधान केल्यामुळे या विद्यालयाला गोकुळातील नंदनवन आल्यासारखे दिसत होते. श्रीकृष्णाची भूमिका आर्या घाणे हिने साकारत दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. यावेळी गोकुळचा गोपाळकाला चला खाऊ रे सर्व मिळून असे म्हणून विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला. तसेच श्रावणधारा या कार्यक्रमात विविध गीतांवर नृत्य सादर करत सर्व विद्यार्थ्यांनी आनंद लुटला.

या कार्यक्रमप्रसंगी सत्यानिकेतन संस्थेचे सचिव टी.एन. कानवडे, प्राचार्य श्री. लेंडे एम.डी. पर्यवेक्षक श्री. नरसाळे एस.ए. श्री.आभाळे निवृत्ती, पत्रकार श्री.प्रकाश महाले, श्री.अजित गुंजाळ आदी शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. एस.आर देशमुख, श्री. भोसले बी.व्ही. श्री. पांडे आर.पी. श्री. साबळे आर. डी. घाणे सर, दिंडे सर, श्री. पांडे विजय यांनी केले होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Website Title: Latest news Rajur SVM School Shravandhaara Celebration 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here