राजूर: लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस पकडले
राजूर: राजूर पोलिस स्टेशन बालकाचे लैंगीक अत्याचारापासून संरक्षण अधी. २०१२ च्या कलम अंतर्गत फरार आरोपी मारुती उर्फ श्रवण मधे रा.चिंचोडी ता. अकोले यास काल रात्री सापळा रचून पकडले.
दीड वर्षापासून फरारी असलेल्या या आरोपीने एका अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. सदर आरोपी पासून अल्पवयीन पिडीत मुलीस एक अपत्यही आहे. सदर आरोपी पिडीत मुलीचा नातेवाईक आहे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून राजूर पोलीस या आरोपीचा शोध घेत होते.
एक महिन्यापूर्वी सदर आरोपी व अल्पवयीन मुलीचा शोध नाशिक येथे लागला असता सदर आरोपी त्याठीकाणाहून पळून गेला. परंतु पिडीत मुलगी त्याठिकाणी सापडली होती. त्यांनतर दिनांक २७ रोजी रात्री बारा वाजता तो पकडला गेला. राजूर पोलीस स्टेशनच्या पथकाने त्यास अटक केली आहे. या आरोपीवर गुन्हा दाखल केला होता.
Get Latest Marathi News & Sangamner & Akole News from Politics, Crime, Sports, Entertainment and local from all Cities Of Maharashtra.
Website Title: Latest Rajur Accused caught