Home अकोले राजूर: सर्वोदयच्या मुलींचे विभागीय कबड्डी स्पर्धेत यश

राजूर: सर्वोदयच्या मुलींचे विभागीय कबड्डी स्पर्धेत यश

राजुर: “वनवासी कल्याण आश्रम महाराष्ट्र” आयोजित विभागीय एकलव्य कबड्डी स्पर्धा नुकत्याच मीनाताई ठाकरे स्टेडीयम नाशिक येथे पार पडल्या.  या स्पर्धेमध्ये गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यानी 19 वर्षाखालील मुली या गटात तृतीय क्रमांक संपादन करीत यश मिळविले. या मुलींना प्रा. विनोद तारू यांनी मार्गदर्शन केले.

या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष मनोहर देशमुख, सचिव टी. एन. कानवडे,  सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य एल.पी.पर्बत, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Website Title: Latest News Svm Rajur kabbadi competition 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here